Marathi News> मनोरंजन
Advertisement

करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाले वडील...

बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संदीप तोषनीवाल यांच्या कथित अफेयरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. 

करिश्मा कपूरच्या दुसऱ्या लग्नाबद्दल पाहा काय म्हणाले वडील...

मुंबई : बॉलीवूडमध्ये सध्या अभिनेत्री करिश्मा कपूर आणि संदीप तोषनीवाल यांच्या कथित अफेयरच्या चर्चा जोरदार सुरु आहेत. असं म्हटलं जातयं की करिश्मा लवकरच या कथित बॉयफ्रेंडसोबत लग्न करु शकते. दरम्यान जेव्हा करिश्माचे वडील रणधीर कपूर यांना याबद्दल विचारले असता तेव्हा त्यांनी हे फेटाळून लावले. 

डीएनएला दिलेल्या मुलाखतीत रणधीर कपूर म्हणाले, करिश्माच्या लग्नाबद्दल ज्या अफवा सुरु आहे त्या खोट्या आहेत. ही चर्चा खोटी आहे. मलाही वाटते की करिश्माने पुन्हा आपलं घर बसवावं मात्र सध्या अशी कोणतीच चिन्हे नाहीयेत. तिने सध्या तिच्या मुलावर लक्ष केंद्रित केलंय आणि त्याच्या पालनपोषणाकडे लक्ष देण्यावर भर दिलाय.

जेव्हा रणधीर कपूरना कथित बॉयफ्रेंड संदीप तोषनीवालबद्दल विचारण्यात आले तेव्हा ते म्हणाले, मी त्यांना ओळखत नाही. करिश्मा सध्या सिंगल आहे आणि ती कोणासोबत बाहेर फिरायला जात असेल तर यात वाईट काय आहे. मात्र जेव्हा तिला लग्न करायचे असेल तेव्हा आमचे आशीर्वाद कायम तिच्यासोबत असतील. करिश्मा कपूरचे लग्न २९ डिसेंबरला २००३मध्ये बिझनेसमन संजय कपूरशी झाले होते. २०१६मध्ये या दोघांनी घटस्फोट घेतला. 

Read More