Marathi News> मनोरंजन
Advertisement

रानी चॅटर्जीला लग्नाची घाई? ब्राईडल लूकमधील फोटो व्हायरल

नुकतेच रानीने आपले नव्या अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. 

रानी चॅटर्जीला लग्नाची घाई? ब्राईडल लूकमधील फोटो व्हायरल

मुंबई :  भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जीने दमदार अभिनयाच्या जोरावर आपला मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. रानी सोशल मीडियावर सतत आपले हटके लूकमधील फोटो शेअर करताना दिसते. फॅन्स देखील रानीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात. इंस्टाग्रामवर रानीचे 1 मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत. तिच्या प्रत्येक पोस्ट चाहत्यांचं लक्षवेधून घेणाऱ्या असतात. 

नुकतेच रानीने आपले नव्या अंदाजातील काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोत रानीने ब्राईडल लूक केल्याचं दिसून येत आहे. 

fallbacks

रानीने लाल रंगाचा लेहंगा, कपाळावर बिंदीया आणि लाल टीकली असा लूक केला आहे. त्यामुळे अनेकांनी रानीला 'लग्न करतेय की काय ? असा प्रश्न विचारायला सुरुवात केली आहे. पण रानीने हा लूक लग्नासाठी नव्हे, तर आगामी चित्रपटासाठी केला आहे.

रानीच्या या फोटोला चाहत्यांची चांगलीच पसंती मिळते आहे. रानी गेल्या काही दिवसांपासून आपल्या फिटनेसवर खूपच मेहनत घेत आहे. वर्कआऊट करतानाचे अनेक व्हिडिओ ते पोस्ट करताना दिसते. वजन वाढल्यामुळे रानीला ट्रोल केलं जात होतं. त्यामुळे ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देत रानीने पुन्हा एकदा फिट अंदाजात कमबॅक केलं आहे.

 

 

Read More