Marathi News> मनोरंजन
Advertisement

धक्कादायक ! ऐन दिवाळीत अभिनेत्रीला 'या' घटनेमुळे गमवावा लागला असता चेहरा

सध्या देश-विदेशातील नागरिक दिवाळीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. 

धक्कादायक ! ऐन दिवाळीत अभिनेत्रीला 'या' घटनेमुळे गमवावा लागला असता चेहरा

मुंबई : सध्या देश-विदेशातील नागरिक दिवाळीचा आनंद घेताना दिसून येत आहेत. यादरम्यान सर्वसामान्यांनीच नव्हे, तर सिने कलाकारांनीही हा सण उत्साहात साजरा केला. अशा स्थितीत आता संपूर्ण सोशल मीडियावर दिवाळीच्या सेलिब्रेशनच्या पोस्ट दिसून येत आहेत. त्याचवेळी भोजपुरी अभिनेत्री रानी चॅटर्जी दिवाळीत एका मोठ्या अपघातातून बचावली आहे. 

राणीचा हा व्हिडिओ पाहून लोक आश्चर्यचकित 

खरंतर राणी चॅटर्जी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. ती अनेकदा तिच्या चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करत असते. दरम्यान, आता तिने स्वतःचा असा एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, जो पाहून लोक आश्चर्यचकित झाले आहेत. त्याच वेळी, अभिनेत्रीचे चाहते तिच्याबद्दल खूप नाराज झाले आहेत.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

थोडक्यात बचावली अभिनेत्री

या व्हिडिओमध्ये राणी दिवाळी साजरी करताना फटाके लावताना दिसत आहे. इथे ती एका फुलबाजीने पाऊस हा फटका पेटवण्याचा प्रयत्न करत आहे. तेवढ्यात हा पाऊस अचानक लावता लावता फुटतो. आणि धूर पसरताना दिसतो. मात्र, या अपघातात अभिनेत्री थोडक्यात बचावली.

 

Read More