मुंबई : ४ वर्षांच्या ब्रेकनंतर राणी मुखर्जीने हिचकी या सिनेमातून बॉलिवूडमध्ये कमबॅक केले. हा सिनेमा शुक्रवारी प्रदर्शित झाला. ट्रेड एनालिस्ट यांनी प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा २-३ कोटींची कमाई करेल, असे मत दिले होते.
संपूर्ण देशभरात सुमारे ९६१ स्क्रीन्सवर या सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. पहिल्या दिवशी या सिनेमाने ३.२५ कोटींची कमाई केली. याचदरम्यान प्रदर्शित झालेला अजय देवगणचा रेड हा सिनेमा देखील बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाल करत आहे. पण राणीच्या हिचकी सिनेमाचा त्यावर काही प्रमाणावर का होईना पण परिणाम झाला.
ट्रेड एनालिस्ट रमेश बाला यांनी ट्वीट करून हिचकीचे पहिल्या दिवसाचे कलेक्शन जाहिर केले. तो आकडा आहे ३.२५ कोटी. त्याचबरोबर सिनेमा वीकेंडला जबरदस्त कमाई करण्याची शक्यता आहे.
#RaniMukerji 's #Hichki opens to ₹ 3.25 Crs All-India Nett on Day 1..
— Ramesh Bala (@rameshlaus) March 24, 2018
WOM is good.. Expected to grow this weekend.. pic.twitter.com/HbRvCRy9QU
यात राणी शालेय शिक्षिकेची भूमिका साकारत आहे. यात ती नैना माथुर ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिला सारखी उचकी येण्याचा त्रास असतो. त्यामुळे तिच्या करिअरमध्ये अडथळे येत असतात. रानीने सिनेमाचे अनोख्या पद्धतीने प्रमोशन केले होते. यात तिने आयुष्यातील कोणती गोष्ट हिचकी झाली, असे सेलिब्रेटींना विचारले होते. त्यावर शाहरुख खान, अनिल कपूर, कतरिना कैफ यांसारखे सेलिब्रेटी बोलले होते.