Ranveer Allahabadia's First Video after 2 Months : सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि कंटेन्ट क्रिएटर रणवीर अलाहाबादियानं फेब्रुवारी महिन्यात झालेल्या वादानंतर आता जवळपास 2 महिन्यांनंतर एक व्हिडीओ शेअर केला आहे. रणवीरनं हा व्हिडीओ त्याच्या युट्यूब चॅनेलवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये रणवीरनं त्या लोकांचे आभार मानले आहे ज्यांनी या वादाच्या काळात त्याला पाठिंबा दिला. तर अशा लोकांची माफी मागितली आहे ज्यांच्या भावना त्यानं दुखावल्या आहेत. त्यानं या व्हिडीओपासून एक नवीन सुरुवात असं म्हटलं आहे आणि हे वचन दिलं आहे की यापुढे तो जो काही कन्टेन्ट बनवेल तो खूप विचार करून बनवेल.
व्हिडीओची सुरुवात एका मॉनटाजनं होते. या मॉनटाजवर त्यानं लिहिलं की बोलायला अजून खूप काही आहे, पण आता नाही. त्यानंतर रणवीर हात जोडून त्या लोकांचे आभार मानले ज्यांनी इतक्या कठीण परिस्थितीत त्याला साथ दिली. त्यानं सांगितलं की त्याच्यासाठी हा फार वाईट काळ होता. त्यानं सांगितलं की या दरम्यान, लोकांनी केलेल्या पॉझिटिव्ह मेसेजनं त्याला सावरण्यात खूप मदत केली.
रणवीर अलाहाबादियानं त्याच्या क्रूच्या सदस्यांचं आभार मानले जे त्याच्यासोबत या कठीण काळात त्याच्यासोबत राहिले. रणवीरनं सांगितलं की '00 लोकांच्या टीमपैकी एकानं देखील या कठीण काळात रिझाइन केलं नाही. त्यासोबतच रणवीरनं त्याच्या कंटेन्ट क्रिएशनला घेऊन एक वक्तव्य केलं आहे. रणवीरनं सांगितलं की 'मी वचन देतो की पुढच्या 20 ते 30 वर्षांपर्यंत जोपर्यंत मी कंटेन्ट बनवेन, मी हे काम आता जबाबदारीनं करेन. मला ही गोष्ट कळली आहे की माझ्या खांद्यावर किती मोठी जबाबदारी आहे. ही गोष्ट कळली की तुम्ही मला तुमच्या कुटुंबातील एक भाग समजता, ही सगळ्यात मोठी जबाबदारी आहे.'
हेही वाचा : 'सिकंदर' शूट करण्याआधी रश्मिकाला ओळखत नव्हता सलमान खान! म्हणाला, 'तिचे व्हिडीओ माझ्या...'
रणवीर एलाहाबादियानं समय रैनाच्या इंडियाज गॉट लेटेंटवर एका स्पर्धकाला आई-वडिलांशी संबंधीत एक अश्लील प्रश्न विचारला. रणवीरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जसा व्हायरल झाला त्यानंतर समय रैना आणि रणवीर अलाहाबादीया विरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. या वादानंतर समय रैनानं इंडियाज गॉट लेटेन्टचे व्हिडीओ डिलीट केले आणि रणवीरनंतर सगळ्या जनतेकडे माफी मागितली.