Marathi News> मनोरंजन
Advertisement

हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला दीपिका - रणवीर

ब्रेक अप झाल्याच्या कितीही वावड्या उठल्या तरी दीपिका - रणवीरनं हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगसाठी दाखल होत आपलं नातं कठिण परिस्थितीतही घट्ट असल्याचं दाखवून दिलंय. 

हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगला दीपिका - रणवीर

मुंबई : ब्रेक अप झाल्याच्या कितीही वावड्या उठल्या तरी दीपिका - रणवीरनं हातात हात घालून 'पद्मावत'च्या स्क्रिनिंगसाठी दाखल होत आपलं नातं कठिण परिस्थितीतही घट्ट असल्याचं दाखवून दिलंय. 

fallbacks
दीपिका रणवीर हातात हात घालून

'पद्मावत'च्या वादाच्या पार्श्वभूमीवर बऱ्याच दिवसानंतर दीपिका रणवीर या निमित्तानं एकत्र दिसले. मुंबईत मंगळवारी रात्री हे दोन स्टार एकमेकांच्या हातात हात घालून मोठ्या आत्मविश्वासानं आणि हसत सगळ्यांना सामोरे गेले. 

'पद्मावत'ला करणी सेनेच्या असलेल्या विरोधावरून दीर्घ काळापासून संपूर्ण देशात वातावरण ढवळून निघालंय. या सिनेमात रणवीर सिंह अलाउद्दीन खिलजी तर दीपिका रानी पद्मावतीच्या भूमिकेत दिसत आहेत. स्क्रिनिंगसाठी दीपिका-रणवीर जोडीनं आले असेल तरी सिनेमात मात्र या दोघांचा सोबत असा एकही सीन नाही, हे विशेष.

 

Read More