Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ranveer Singh 83 Teaser Out: ऐतिहासिक विजय पाहून भावूक करणारा क्षण

'83'चा ऐतिहासिक विजय, लवकरचं रूपेरी पडद्यावर  

Ranveer Singh 83 Teaser Out: ऐतिहासिक विजय पाहून भावूक करणारा क्षण

मुंबई : क्रिकेटप्रेमींची प्रतीक्षा अखेर संपली आहे. अभिनेता रणवीर सिंग स्टारर '83' सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. क्रिकेट विश्वातील भारताच्या ऐतिहासिक विजयावर आधारलेला सिनेमा 24 डिसेंबर रोजी रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सिनेमाचीचं चर्चा आहे. सिनेमाची कथा 1983 साली टीम इंडियाच्या विश्वचषक विजयावर आधारित आहे. 1983 साली, महान क्रिकेटपटू आणि माजी कर्णधार कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली, भारतीय क्रिकेट संघाने इतिहास रचला.

2021 संपण्यापूर्वी रणवीर सिंगने सिनेमाचा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. कपिल देव यांच्या जीवनावर आधारित सिनेमी हिंदी, तमिळ, कन्नड, तेलगू आणि मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमात रणवीर सिंग कपिल देव यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

टीझरची झलक पाहिल्यानंतर ऐतिहासिक विजयाच्या आठवणी ताज्या होत आहेत. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण व्यतिरिक्त, सिनेमात ताहिर राज भसीन, साकिब सलीम, एमी विर्क आणि पंकज त्रिपाठी यांची महत्त्वाची भूमिका आहे. सिनेमाचा ट्रेलर 24 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. 

Read More