Marathi News> मनोरंजन
Advertisement

CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग

विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत. 

CONFIRM : या शहरात दीपिका आणि रणवीर करणार डेस्टिनेशन वेडिंग

मुंबई : विरूष्काच्या लग्नानंतर बॉलिवूडमध्ये आणखी एका लग्नाची चर्चा आहे. आणि ती चर्चा आहे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगच्या लग्नाची. या जोडीने बाजीराव मस्तानी, गोलियों की रासलीला राम लीला आणि पद्मावती या सिनेमांत एकत्र काम केलं आहे. ही जोडी प्रेक्षकांनी पडद्यावर स्विकारली. आता ही जोडी खऱ्या आयुष्यातही एकमेकांचे सोबती होऊ इच्छित आहेत. 

दीपवीर करणार या ठिकाणी डेस्टिनेशन वेडिंग 

रणवीर आणी दीपिका लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. लग्नाची तयारी सुरू झाली आहे. विरूष्काने आपल्या लग्नासाठी इटलीची निवड डेस्टीनेशन वेडिंगसाठी केली आहे. सूत्रांच्या माहिती नुसार दोघांनी डेस्टिनेशन वेडिंगला पसंती दिली आहे आणि यासाठी त्यांनी स्वित्झर्लंडची निवड केली आहे. तुम्हाला सांगतो रणवीर सिंग हा स्वित्झर्लंडचा ब्रँड अॅम्बेसिडर आहे. त्यामुळे तिथल्या सरकारने त्यांना तिकडे लग्न करण्याचे आमंत्रण दिले आहे आणि रणवीरने ते स्वीकारले आहे.

दीपिका व रणवीर या दोघांनी लग्नासाठी यावर्षी सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यातील चार तारखा निश्चित केल्या आहेत. यापैकी एक तारीख अंतिमत: निश्चित करण्यात येईल. दीपिका व रणवीरचे लग्न एक खासगी सोहळा असेल. केवळ कुटुंबातील व्यक्ती आणि अतिशय जवळचे मित्र व नातेवाईक एवढेच या लग्नात असतील. काही दिवसांपूर्वी दीपिका आपल्या आईसोबत दागिण्यांची खरेदी करताना दिसली होती. 

विरूष्काच्या पाठोपाठ या लग्नाची चर्चा बॉलिवूडमध्ये जोरदार रंगली आहे. त्यामुळे आता या लग्नाची निश्चित तारीख कधी समोर येते याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे.  

Read More