Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणबीरने नाकारलेल्या चित्रपटांनी रणवीरला बनवलं 'बाजीराव'

का होते नेहमी रणवीर आणि रणबीरची तुलना? 

रणबीरने नाकारलेल्या चित्रपटांनी रणवीरला बनवलं 'बाजीराव'

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग सर्वत्रच त्याच्या प्रेम आणि सकारात्मक एनर्जीसाठी ओळखला जातो. सोशल मीडियावर रणवीरचा नेहमीच काहीतरी हटके अंदाज पाहायला मिळतो. रणवीरची ड्रेसिंग स्टायल, त्याचे चित्रपट इत्यादी गोष्टींमुळे तो कायम चर्चेत असतो. आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या बद्दल काही खास गोष्टी जाणून घेवू. रणवीरला ज्या चित्रपटांनी प्रसिद्ध अभिनेत्यांच्या यादीत बसण्याचा मान दिला, त्या चित्रपटांना अभिनेता रणबीर कपूरने नकार दिला. असे  4 चित्रपट आहेत, जे आधी रणबीर कपूरला ऑफर करण्यात आले.

बँड बाजा बारात (Band Baaja Baaraat)

fallbacks


यशराज बॅनरखाली साकारण्यात आलेल्या बँड बाजा बारात चित्रपटाच्या माध्यमातून रणवीर सिंगने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत  अभिनेत्री अनुष्का शर्मा दिसली होती. या चित्रपटासाठी सर्वप्रथम अभिनेता रणबीर कपूरला विचारण्यात आलं होतं पण चित्रपटाला त्याने नकार दिला. 

गोलियों की रासलीला: रामलीला

fallbacks


रामलीला चित्रपटानंतर रणवीरच्या करियरला एक नवी कलाटणी मिळाली. या चित्रपटानंतर त्याच्या चाहत्यांच्या संख्येत देखील कमालीची वाढ झाली. या चित्रपटासाठी सुद्धा रणबीर कपूरला विचारण्यात आलं होतं पण चित्रपटाला त्याने नकार दिला. 

बेफिक्रे (Befikre)

fallbacks


2016साली प्रदर्शित झालेल्या बेफिक्रे (Befikre) चित्रपटातील गाण्यांनी सर्वांना वेड लावलं. पण हा चित्रपट  बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला नाही. 

गली बॉय (Gully Boy)

fallbacks


गली बॉय चित्रपटाने तर सर्व रिपोर्ट्स ब्रेक केले. रणबीर कपूरला एमसी शेरच्या भूमिकेची ऑफर देण्यात आली होती पण त्याला रणवीरसह सहाय्यक अभिनेता म्हणून काम करण्याची इच्छा नव्हती. म्हणूनच रणबीरने हा चित्रपट करण्यास नकार दिला आणि ही भूमिका सिद्धांत चतुर्वेदीला देण्यात आली.

Read More