Marathi News> मनोरंजन
Advertisement

गली बॉयच्या सेटवर रणवीरने अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन...

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आपल्या नव्या सिनेमातून म्हणजे गर्ली बॉय मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 

गली बॉयच्या सेटवर रणवीरने अनोख्या पद्धतीने साजरा केला महिला दिन...

नवी दिल्ली : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग लवकरच आपल्या नव्या सिनेमातून म्हणजे गर्ली बॉय मधून प्रेक्षकांच्या भेटीला येईल. यात रणवीर सिंग आणि आलिया भट्टची जोडी जमणार आहे. ८ मार्च म्हणजे कालच आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी महिलांनी आपले बाईपण साजरे केले. त्याचबरोबर गर्ली बॉयच्या सेटवरही खास पद्धतीने महिला दिन साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त सेटवरील सर्व मुलांनी चक्क स्कर्ट परिधान केला होता.

रणवीरने केला खुलासा

याचा खुलासा चक्क रणवीर सिंगने केला आहे. काही वेळापूर्वी प्रियंका चोप्राने आपल्या ट्विटर हॅंडलवर एक व्हिडिओ शेअर केला. यात प्रियंका-रणवीर व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंग करत आहेत. त्यात प्रियंकाच्या प्रश्नाचे उत्तर देताना रणवीरने त्याने चक्क स्कर्ट घातला असल्याचे सांगितले.

पहा व्हिडिओ...

 

पहा फोटोज...

 

काही दिवसांपूर्वी आलेला पद्मावत या वादग्रस्त सिनेमातील रणवीरच्या अभिनयाचे प्रचंड कौतूक झाले. आता सध्या तो गर्ली बॉय या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. हे शूटिंग पूर्ण होताच तो रोहीत शेट्टीच्या सिंबा सिनेमाच्या शूटिंगला सुरूवात करेल.

 

Read More