Ranveer Singh: रणवीर सिंग आपल्या अतरंगी फॅशनसाठी जाणला जातो. त्याला त्यामुळे ट्रोलर्सनेही सतत ट्रोल केलं आहे आणि त्याची पुरती वाट लावली आहे. त्यातून त्याच्यावर केलेले मीम्स तर आजही लोकांना हसवतात. आजही रणवीरला लोकं त्याच्या अभिनयासोबतच त्याच्या विक्षिप्त फॅशनसाठी जास्त ओळखतात. तो कुठेही स्पॉट झाला तरी त्याला मीडिया आणि पापाराझी काही केल्या सोडत नाहीत.
रणवीर नुकताच बीअर ग्रील्सच्या 'मॅन व्हर्सेस वाईल्ड' या शोमध्ये दिसला होता. तेव्हाही रणवीर हा ट्रोल झालाच होता त्यातून अनेकदा त्याच्या विक्षिप्त फॅशनमुळे ट्रोल होणारा रणवीर यावेळी मात्र त्याच्या भलत्याच एका वागणूकीमुळे ट्रोल झाला होता. बीअर ग्रील्सचे शोबद्दल आभार मानताना तो बीअरचे वेड्यासारखे चुंबन घेत सुटला होेता त्यामुळे रणवीरला त्यावरूनही जबरदस्त ट्रोल करण्यात आलं होतं.
रणवीर सिंगने सोशल मीडियावर नुकताच एक धुमाकूळ घातला आहे. तो त्याच्या विक्षिप्त फॅशनवरून लोकप्रिय आहेच त्यातून आता तर त्याने त्याला केलेलं ट्रोलिंग मनावर घेतलेलं दिसतंय कारण त्याने चक्क न्यूड फोटोशूट करत सगळ्यांनाच घायाळ करून सोडलं आहे.
रणवीर सिंग कार्पेटवर पसरलेला दिसतोय तर इतर फोटोंमध्ये त्याने काळी अंडरवेअर घातली आहे. रणवीरचे असे म्हणणे आहे की शारीरिकदृष्ट्या नग्न असणे त्याच्यासाठी फार मोठी गोष्ट नाही.
काहींना हे फारच चांगलं झालंय असं वाटतं आहे कारण शेवटी रणवीर सिंगने त्याच्या कपड्यांच्या, विक्षिप्त कपड्यांच्या निवडीबद्दल नाराज झाल्यानंतर तरी कपडे पूर्णपणे काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून त्याला पुन्हा एकदा ट्रोल करण्यात आले आहे. काहींनी असं म्हटलं की हा त्याचा 'मॅन व्हर्सेस वाईल्ड'मुळे झालेला परिणाम आहे तर काहींनी म्हटलंय की त्याला आता काय हॉलीवूडला टक्कर देऊन त्याची कॉपी करायची आहे का? तर एक ट्रोलरने म्हटलंय की आता हा वेश करून तो काय टारझन होणार आहे का?
Lastest pics of super sexy #RanveerSingh
— Harminder (@Harmindarboxoff) July 21, 2022
He sents a indirect message to people trolling him for his dress selection. pic.twitter.com/GRV9gqgNob
रणवीरने ज्या मॅगझीनला हे फोटोशूट दिलं आहे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकांऊटवरून हे फोटोज शेअर करून चाहत्यांना धक्का दिला आहे. लवकरच रणवीर 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमातून दिसणार आहे.