Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीरने घेतली दीपिकाच्या वडीलांची भेट, चर्चांना उधाण

बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्या अफेअरची चर्चा सतत होत राहते.

रणवीरने घेतली दीपिकाच्या वडीलांची भेट, चर्चांना उधाण

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री दीपिका पादुकोन यांच्या अफेअरची चर्चा सतत होत राहते.

दोघे अनेकदा एकमेकांसोबत बघायला मिळतात. पण नुकतीच रणवीरने दीपिकाचे वडील प्रकाश पादुकोन यांची भेट घेतली. आता दीपिकाच्या बॉयफ्रेन्डने वडीलांची भेट घेतली म्हटल्यावर चर्चा तर होणारच!

नुकतेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या हॉट कपलचे लग्न झाले. अजूनही त्यांच्या लग्नाची चर्चा सुरू आहे. गेली अनेक वर्ष दोघे ऎकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्याप्रमाणे रणवीर आणि दीपिकाही हॉट कपल आहे. त्यांच्याही लग्नाच्या चर्चा होत असतात. आता दीपिकाच्या वडीलांची रणवीरने भेट घेतल्यावरही अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण जसे तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये. 

रणवीर सिंह नुकताच बेंगळुरूमध्ये पादुकोन-द्रविड सेंटर फॉर स्पोर्ट्स एक्सलेंसच्या लॉन्चिंग इव्हेंटमध्ये गेला होता. इथे राहुल द्रविड, अभिनव बिंद्रा, गीत सेठी आणि विश्वनाथ आनंद उपस्थित होते. इथेच रणवीरने प्रकाश पादुकोन यांची भेट घेतली. 

खरंतर या भेटीकडे दोघांच्या लग्नाचा संबंध जोड्ला जात आहे. पण अजूनतरी तसे काही समोर आले नाही. सध्या दोघांनाही ‘पद्मावती’च्या रिलीजकडे डोळे लागले आहे.

Read More