Marathi News> मनोरंजन
Advertisement

भर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video

Ranveer Singh On bedroom secrets: रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही.

भर कार्यक्रमात रणवीरने शेअर केलं बेडरूम सिक्रेट, दीपिकाही लाजली; पाहा Video

Deepika Padukone Viral Video: बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय कपल म्हणून अभिनेत्री दीपिका पादूकोण (Deepika Padukone) आणि अभिनेता रणवीर सिंहकडे (Ranveer Singh) पाहिलं जातं. दोन्ही कलाकारांची केमिस्ट्रीच वेगळी. दोघांचे अनेक व्हिडिओ (Viral Video) सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशातच एका अवॉर्ड फंक्शनमधील कार्तिक आर्यन आणि दीपिका पदुकोणचा एक जुना व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये रणवीरने बेडरूम सिक्रेट शेअर केलं.

रणवीर आणि दीपिका अनेक अवॉर्ड फंक्शनमध्ये सहभागी होतात. एवढंच नाही तर जिथं संधी मिळेल तिथं नाचण्याची आणि धमाल करण्याची संधी सोडत नाही. अशातच बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनने भर मंचावर दीपिकाला चिमटे काढले. व्हायरल व्हिडिओमध्ये दीपिका पदुकोणला तिच्या बेडरूमच्या सिक्रेटबद्दल (Beedroom Secrets) प्रश्न विचारताना दिसत आहे. तू बेडच्या उजव्या बाजूने उतरतेस की डाव्या बाजूने? असा सवाल कार्तिकने रणवीरसमोर दीपिकाला विचारला.

आणखी वाचा - भर कार्यक्रमात श्रेयस तळपदे ढसाढसा रडला; जितेंद्र जोशीने सांगितला 'तो' किस्सा अन्... पाहा Video

कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) हा प्रश्न ऐकून दीपिका आश्चर्यचकित झाली. दीपिका त्याच्या प्रश्नांवर विचार करून उत्तर देते. उजवीकडून उतरते, असं दीपिका म्हणते. मात्र, हे उत्तर देताना दीपिका लाजल्याचं दिसून आलंय. दीपिकाचा चेहरा पाहून अनेकांना हसू आवरलं नाही. त्याचवेळी कार्तिकने प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दीपिकाचा पती रणवीर सिंगलाही हा प्रश्न विचारला. 

पाहा Video

दरम्यान, जेव्हा मी तिला बाहेर सोडू तेव्हा उजवं की डावं ठरवेल ना, असं रणवीर म्हणतो. रणवीरचं उत्तर ऐकून अवॉर्ड शोमध्ये अनन्या पांडेला हसू आवरता येत नाही. तोंडावर हात ठेऊन ती हसताना दिसली. कार्तिकच्या या प्रश्नामुळे कार्यक्रमात रंगत आल्याचं दिसून आलं. या कार्यक्रमात धमाल, मस्ती आणि गप्पा मारताना दोन्ही जोडपं दिसलं होतं.

Read More