Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंगची न्यूड फोटोशूटबाबत पहिली प्रतिक्रिया, संतापत म्हणाला, "मी काहीही...."

बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग त्याच्या अतरंगी शैलीसाठी ओळखला जातो. 

रणवीर सिंगची न्यूड फोटोशूटबाबत पहिली प्रतिक्रिया, संतापत म्हणाला,

मुंबई : बॉलीवूडचा सुपरस्टार रणवीर सिंग त्याच्या अतरंगी शैलीसाठी ओळखला जातो. नुकतंच रणवीर सिंगने असं फोटोशूट केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर लोकं रणवीर सिंगच्या या फोटोशूटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. दरम्यान, आता रणवीरने या लेटेस्ट फोटोशूटबाबत मौन सोडलं आहे.

फोटोशूटवर रणवीर सिंगचं वक्तव्य
हे लक्षात घेण्यासारखं आहे की गुरुवारी रात्री उशिरा रणवीर सिंगचे काही फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. ज्यामध्ये तो न्यूड अवस्थेत दिसत आहे. यानंतर रणवीर सिंगचं हे लेटेस्ट फोटोशूट पाहताच व्हायरल झालं आणि सर्वत्र त्याची चर्चा सुरू झाली. खरंतर रणवीर सिंगने हे फोटोशूट पेपर मॅगझिनसाठी केलं आहे.  मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत रणवीरने आपला राग काढला आणि म्हणाला की, "मला तिथल्या लोकांची काळजी असेल.

''मी लोकांची पर्वा करत नाही. मी काय घालावं आणि काय घालू नये हे मी ठरवणार. लोकांचं काम फक्त बोलणं आहे. मला त्याची पर्वा नाही. एवढच नव्हेतर मी 1000 लोकांच्या समोर असं फोटोशूट करु शकतो''.

रणवीर सिंगवर टीका होत आहे
खरतर, या वादग्रस्त फोटोशूटनंतर आता रणवीर सिंगवर सोशल मीडियावर जोरदार टीका होत आहे. ज्याच्या आधारे रणवीर सिंग ट्विटरवर ट्रेंड करत आहे. या फोटोशूटसाठी लोक त्याला खूप ट्रोल करत आहेत. एवढंच नाही तर पश्चिम बंगालच्या टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती यांनीही रणवीर सिंगच्या फोटोशूटवर कमेंट केली  आहे.

Read More