Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर म्हणतो, दीपिका नव्हे तर 'ही' अभिनेत्री रोमँटिक एनकाऊंटर करते

कोण आहे ही अभिनेत्री 

रणवीर म्हणतो, दीपिका नव्हे तर 'ही' अभिनेत्री  रोमँटिक एनकाऊंटर करते

मुंबई : रणवीर आणि दीपिका दोघेही लग्नानंतर आता आपल्या कामात व्यस्त झाले आहेत. असं असलं तरीही दोघं वेळ काढून एकत्र अनेक कार्यक्रमांना उपस्थिती दाखवत आहेत. तेथील त्यांचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. 

यावरून आता रणवीर फक्त आणि फक्त दीपिकाचं गोड कौतुक करेल असं वाटलं होतं. पण असं न होता रणवीरने एका अभिनेत्रीचं भरभरून कौतुक केलं आहे. 

fallbacks

सध्या रणवीर आपल्या आगामी 'सिंबा'च्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. रणवीर सिंह आणि सारा अली खानची केमिस्ट्री सिनेमाच्या ट्रेलर आणि गाण्यातून समोर आली आहे. 

अनेकदा हे दोघं प्रमोशनमध्ये खूप धम्माल उडवून देतात. झी न्यूझशी बोलताना रणवीर म्हणतो की, रिअल लाइफमघ्ये सारा फक्त रोमँटिक एनकाऊंटर करते. 

सिंबा सिनेमात साराचा एक डायलॉग आहे जिथे ती म्हणते,"अगर आपको एनकाउंटर के टिप्स चाहिए हो तो मुझसे ले लेना". तिच्या याच डायलॉगवरून मस्करी करताना रणवीर दिसतो. 

fallbacks

'केदारनाथ' या सिनेमातून सारा अली खानने अगदी सुरूवातीपासून लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. यावरून अनेकदा रणवीर म्हणतो की, साराची खूप फॅन फॉलोइंग आहे. 

रणवीर प्रत्येक प्रमोशनमध्ये साराचं कौतुक करताना थांबत नाही. दिग्दर्शक रोहित शेट्टी साराचं वय आणि अनुभव बघता तिला एका लहान मुलीसारखं ट्रिट करतो. पण तिच्या कामामुळे तो खूप खूष आहे. 

सारा आणि रणवीरचा सिनेमा 'सिंबा' लवकरच प्रदर्शित होत आहे. सैफ अली खान आणि अमृता सिंहची मुलगी साराने 'केदारनाथ'मधून डेब्यू केला आहे. या सिनेमात ती सुशांत सिंह राजपूतसोबत दिसली आहे. 

 

Read More