Marathi News> मनोरंजन
Advertisement

रणवीर सिंगचा नवा लूक व्हायरल, संजय दत्त आणि अक्षय खन्नासोबत करणार जबरदस्त कमबॅक

चित्रपटाच्या शुटींगदरम्यान रणवीरचा लूक लीक झाला आहे. चाहत्यांनी त्याला शूटिंग सेटवर पाहताच फोटो-व्हिडीओ काढायला सुरुवात केली. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. पाहूयात कसा असा आहे 'धुरंधर' चित्रपटातील रणवीरचा लूक.

रणवीर सिंगचा नवा लूक व्हायरल, संजय दत्त आणि अक्षय खन्नासोबत करणार जबरदस्त कमबॅक

Ranveer Singh: अनेक बॉलिवूड अभिनेते नव्या सिनेमांसह पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाले आहेत. त्यात रणवीर सिंगचाही समावेश आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचं शूटिंग सध्या जलद गतीने सुरू असून, या चित्रपटात अनेक नामांकित कलाकार एकत्र दिसणार आहेत. चित्रीकरणादरम्यान रणवीरचा लूक लीक झाला आहे. चाहत्यांनी त्याला शूटिंग सेटवर पाहताच फोटो-व्हिडीओ काढायला सुरुवात केली आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.

सध्या बॉलिवूडमध्ये अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम सुरू आहे आणि त्यात अनेक सुपरस्टार्स एका फ्रेममध्ये पाहायला मिळणार आहेत. 'शक्तिमान' चित्रपटामुळे चर्चेत आलेला रणवीर सिंग आता आपल्या दुसऱ्या प्रोजेक्टच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात संजय दत्त आणि अक्षय खन्ना यांच्यासारखे  कलाकार खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहेत. सोशल मीडियावर रणवीरचा एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यात तो चाहत्यांच्या गराड्यात अडकलेला दिसतो आणि त्यात त्याचा नवा लूकही समोर आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हा व्हिडीओ रणवीरच्या फॅन पेजवर शेअर करण्यात आला आहे. तो सध्या 'धुरंधर' या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. लांब केस आणि वाढलेली दाढी असलेला त्याचा लूक प्रेक्षकांना चकित करत आहे. शूटिंगच्या वेळी चाहत्यांनी त्याला वेढा घातला आणि सेल्फी घेण्यासाठी गर्दी केली. रणवीरने चाहत्यांना निराश न करता त्यांच्यासोबत हातमिळवणी केली. अखेरीस, त्याचे बॉडीगार्ड त्याला गर्दीतून सुरक्षित बाहेर घेऊन गेले.

हे ही वाचा: सलग 10 फ्लॉप चित्रपट, तरीही अर्जुन कपूर करोडपती; संपत्ती ऐकून बसेल धक्का!

'धुरंधर' चित्रपटातील रणवीरचा लूक आधीही अनेक वेळा लीक झाला आहे. यापूर्वी त्याचे संजय दत्तसोबतचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर झळकले होते. या चित्रपटाचं दिग्दर्शन आदित्य धर करत असून, यात आर माधवन, अर्जुन रामपाल आणि अक्षय खन्नासारखे अनेक दिग्गज कलाकार झळकणार आहेत.

रणवीर सिंगच्या आगामी दोन प्रोजेक्ट्सवर लक्ष
या चित्रपटानंतर रणवीर सिंग 'डॉन 3' चित्रपटासाठी काम सुरू करणार आहे. अलीकडेच कियारा अडवाणीला या प्रोजेक्टमधून वगळण्यात आल्याचं समोर आलं आहे. रणवीर सिंगला शाहरुख खानच्या 'डॉन' सिरीजमध्ये घेतल्याबद्दल काही प्रेक्षक समाधानी नाहीत, तर काहींना विश्वास आहे की तो त्या पात्राला न्याय देईल. दरम्यान, रणवीर 'शक्तिमान' या बहुचर्चित प्रोजेक्टचा भाग असेल की नाही, याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

Read More