Marathi News> मनोरंजन
Advertisement

2 कोटींच्या कारच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला प्रसिद्ध भारतीय गायक; थोडक्यात वाचला! Video पाहाच

Famous Singer Falls Face First Out Of Moving SUV: हा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडीओ पाहून चिंता व्यक्त केली आहे. नेमकं घडलं काय जाणून घ्या.

2 कोटींच्या कारच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला प्रसिद्ध भारतीय गायक; थोडक्यात वाचला! Video पाहाच

Famous Singer Falls Face First Out Of Moving SUV: मागील आठवड्यामध्येच दक्षिणेतील प्रसिद्ध चित्रपट निर्माते पा. रणजीत यांच्या आगामी चित्रपटाच्या सेटवर प्रसिद्ध स्टंटमन एसएम राजूचा कारच्या स्टंटदरम्यान मृत्यू झाला. रॅम्पवर गाडी योग्यरित्या उतरू न शकल्याने गाडी हवेतच अनेक वेळा फिरली आणि नंतर जोरात जमिनीवर आदळून गंभीर जखमी झालेला राजू मरण पावला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात असतानाच एक प्रसिद्ध गायक अशाच एका विचित्र अपघातातून अगदी थोडक्यात बचावला आहे. 

कोणाबरोबर घडला हा प्रकार?

तरुणाईमध्ये आपल्या रॅप गाण्यांच्या माध्यमातून ओळख मिळवणारा प्रसिद्ध गायक एमीवे बंटाई म्हणजेच बिलाल शेख हा एक मोठ्या अपघातातून थोडक्यात वाचला आहे. आपल्या एका नव्या गाण्याचं शुटींग करत असतानाच एमीवे बंटाई धावत्या कारच्या खिडकीतून बाहेर फेकला गेला आणि थेट रस्त्यावर पडला. नेमकं काय घडलं हे सारं गाण्याच्या मेकिंगच्या व्हिडीओत कैद झालं असून हा गायक थोडक्यात वाचल्याची जोरदार चर्चा आहे. 

तोंडावर पडला...

रॅपर एमीवे बंटाई त्याच्या आगामी गाण्याचे स्टंट शूट करताना एक विचित्र अपघात झाला. 2 कोटींहून अधिक महागड्या अशा लॅण्ड क्रुजर कारच्या खिडकीमधून बाहेर लटकत गाण्यातील एक सिकवेन्स शूट करत असतानाच अचानक गाडीने ब्रेक दाबला आणि एमीवे बंटाईला मोठा धक्का बसला. अचानक बसलेल्या धक्क्यामुळे तोल गेल्याने रॅपर चालत्या कारमधून थेट तोंड जमिनीकडे करत पडला. या विचित्र अपघाताचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

व्हिडीओत काय दिसतंय?

व्हिडिओमध्ये, एमीवे चालत्या कारच्या खिडकीवर बसलेला दिसत आहे. त्याचवेळी कार अचानक कचकचून ब्रेक दाबल्यासारखी जागेवर थांबली. बेसावध असलेला एमीवे तोल गमावून चालत्या एसयूव्हीमधून कारमधून खाली पडताना थेट तोंडावर आपटला. कॅमेरामनने त्वरित रॅपरकडे धाव घेतली. एमीवेला त्याच्या सहकाऱ्यांनी तातडीने रस्त्यातून बाजुला करत तो सुरक्षित असेल याचा खात्री केली.

अनेकांनी व्यक्त केली चिंता

हा व्हिडिओ व्हायरल होताच, एमीवेच्या चाहत्यांनी त्याला गाण्यांच्या या असल्या व्हिडिओंच्या चित्रिकरणादरम्यान अधिक सावध राहण्याचा सल्ला दिला आहे. एवढा जीव धोक्यात घालून शुटींग करु नकोस असा सल्ला चाहत्यांनी एमीवेला दिला आहे. काहींनी कमाप्रती असलेल्या त्याच्या श्रद्धेचं कौतुक केलं आहे. तर काहींनी त्याच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

दोन गाण्यांमुळे झाला लोकप्रिय

एमीवे बंटाईहा अवघ्या 30 वर्षांचा आहे. 13 नोव्हेंबर 1995 रोजी जन्मलेल्या या गायकाने 2013 मध्ये इंग्रजीमध्ये रॅप गाणी तयार करण्यास सुरुवात केली. 'बंटाई' आणि 'मचायेंगे' सारख्या त्याच्या हिंदी गाण्यांनी त्याला लोकप्रियता मिळाली. तो आत्मविश्वास, वास्तविक जीवनातील संघर्ष आणि तुमच्या स्वप्नांचे अनुसरण करण्याच्या थीम असलेल्या गाण्यांसाठी ओळखला जातो. एमीवेने स्नूप डॉग आणि मॅकलमोर, ख्रिस गेल आणि इतर आंतरराष्ट्रीय स्टार्ससोबत देखील काम केले आहे.

Read More