Marathi News> मनोरंजन
Advertisement

बॉलिवूडमध्ये आणखी एक घटस्फोट, 'हा' स्टार कलाकार घेणार Divorce

गेल्या अनेक महिन्यांपासून प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत.

बॉलिवूडमध्ये आणखी एक घटस्फोट, 'हा' स्टार कलाकार घेणार Divorce

मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून देशातील अनेक फिल्म इंडस्ट्रीतून प्रसिद्ध अभिनेता-अभिनेत्रींच्या घटस्फोटाच्या बातम्या समोर येत आहेत. त्यात आता बॉलिवूडमध्ये आणखी एका घटस्फोटाची चर्चा सुरु झाली आहे. एक स्टार कलाकार घटस्फोटाच्या मार्गावर आहे. हा घटस्फोट नेमका कोणत्या जोडीचा होतोय, हे जाणून घेऊयात. 
  
रॅप सॉंगने तरूणांना वेड करणारा प्रसिद्ध रॅपर रफ्तार आता घटस्फोट घेण्याच्या तयारीत असल्याची सुत्रांची माहिती आहे. रफ्तारचे सहा वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात येणार असल्याची बातमी आहे. लग्नाच्या सहा वर्षानंतर रफ्तारने पत्नी कोमल वोहरापासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केल्याचे सांगितले जात आहे.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, रफ्तार आणि कोमल यांनी 2020 मध्ये घटस्फोटाचा अर्ज दाखल केला होता. मात्र कोरोनामुळे घटस्फोटाच्या सर्व कामांना विलंब झाला होता. मात्र आता लॉकडाऊन नंतर सर्व सूरळीत झाल्यानंतर त्यांनी आता पुन्हा कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज करण्याची तयारी सुरु केली आहे. आता दोघेही येत्या 6 ऑक्टोबर 2022 रोजी घटस्फोटाच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी करणार आहेत. यानंतर दोघेही विभक्त होतील.  

रफ्तार-कोमलची प्रेमकहाणी
रफ्तार आणि कोमलची प्रेमकहाणी मित्रांमुळेच सुरू झाल्याचे बोलले जाते. त्यांच्या मित्रांनी त्यांची ओळख करून दिली होती. यानंतर दोघांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले होते. 2016 मध्ये  रफ्तार आणि कोमल यांनी लग्न केले होते. सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत रॅपर रफ्तारने लग्नाबाबतची माहिती दिली होती.  

fallbacks

दरम्यान रफ्तारने नुकतचं नुसरत भरुचाच्या जनहित में जारी या चित्रपटासाठी गाणे गायले आहे. तसेच अनेकदा तो एमटीव्ही रोडीज या रिअॅलिटी शोचा गँग लीडर म्हणूनही दिसला होता. 

Read More