Marathi News> मनोरंजन
Advertisement

घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral

'तमांचे पे डिस्को', 'धाकड' आणि 'ऐसा मैं शैतान' यांसारख्या गाण्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या रॅपर रफ्तारने फॅशन स्टायलिस्ट मनराज जावंदासोबत दुसरे लग्न केले आहे. 31 जानेवारी 2025 रोजी या जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले, ज्याचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.

घटस्फोटाच्या काही वर्षांनंतर रॅपर रफ्तारने केलं दुसरं लग्न, फोटो Viral

या लग्नाच्या फोटोमध्ये दोघेही पेस्टल रंगाच्या पारंपरिक पोशाखात एकमेकांकडे हसत बघत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि प्रेम दिसत आहे, ज्यामुळे चाहत्यांना आनंद झाला आहे.न ते या जोडप्याचे कौतुक करत आहेत. सोशल मीडियावर समोर आलेल्या हळदी समारंभाच्या काही फोटोमध्ये रफ्तार आणि मनराज रंगीबेरंगी कपड्यात मस्ती करत असल्याचे दिसत आहे. दोघेही पिवळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसले आणि त्यांचे हास्य आणि मजा पाहून चाहते देखील खुश झाले आहेत. याशिवाय संगीत सेरेमनीच्या एका व्हिडीओमध्ये रफ्तार आणि मनराज 'सपने में मिलती है' या गाण्यावर नाचताना दिसले, ज्यामुळे त्यांच्या लग्नाच्या आनंदात आणखी रंग भरला.

रॅपर रफ्तारने यापूर्वी 2016 मध्ये कोमल वोहरा सोबत लग्न केले होते. या दोघांनी पाच वर्षे डेटिंग केल्यानंतर डिसेंबर 2016 मध्ये लग्न केले. परंतु, त्यांचे संबंध 2020 मध्ये तणावग्रस्त झाले आणि त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज केला. जून 2022 मध्ये त्यांचा घटस्फोट अंतिम ठरला. रफ्तार आणि कोमलचा घटस्पोट झाला असला तरी, रफ्तार आणि मनराज यांच्या कनेक्शनने त्यांच्या चाहत्यांना नव्या आशा दिल्या आहेत. मनराज जावंदा ही एक फॅशन स्टायलिस्ट आहे, जिच्या डिझाइन आणि स्टाईलला अनेक सेलिब्रिटींनी पसंती दिली आहे. ती फॅशन आणि लाइफस्टाइल इंडस्ट्रीत एक स्थापित नाव बनलेले आहे.

कामाच्या बाबतीत रफ्तार भारतीय संगीत उद्योगात एक प्रभावशाली नाव आहे. त्याने 2011 मध्ये 'डान्स इंडिया डान्स' या शोमध्ये नृत्यांगना म्हणून आपले करिअर सुरू केले होते, त्यानंतर त्याने रॅपिंग आणि म्यूजिक कम्पोजिंगमध्ये आपला ठसा उमठवला. यो यो हनी सिंगसोबत त्याने माफिया मुंडीर गटाचा एक भाग म्हणून काम केले आणि नंतर त्याने स्वतःचे म्युझिक प्रोजेक्ट्स सुरू केले. रफ्तारच्या गाण्यांनी तरुण पिढीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. 

हे ही वाचा: अमिताभ बच्चन नाही तर 'या' अभिनेत्यावर होतं जया बच्चनचं खरं प्रेम; पत्नीसमोरच केलं व्यक्त, 'तुझ्या जागी मी असते जर...'

तो अनेक टीव्ही शोजमध्ये देखील सहभागी झाला आहे आणि 'रॅप विद रफ्तार' सारख्या शोमध्ये त्याने सुस्पष्टता आणि समर्पण दाखवले आहे. त्याच्या गाण्यांना फ्युजन म्युझिकचे अनोखे मिश्रण मिळाले आहे, ज्यामुळे तो एक व्हर्सटाईल आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो. 

रफ्तार आणि मनराजच्या लग्नाने त्यांच्या चाहत्यांना एक नविन आशा दिली आहे आणि यापुढे त्यांचा व्यक्तिगत तसेच व्यावसायिक जीवनात आणखी यश आणि प्रेम मिळो, अशी त्यांची अपेक्षा आहे.

Read More