Marathi News> मनोरंजन
Advertisement

रश्मिकाला टक्कर देणारा हा व्यक्ती कोण? ज्याच्या saami saami व्हिडिओची एकच चर्चा

नुकताच या चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

 रश्मिकाला टक्कर देणारा हा व्यक्ती कोण? ज्याच्या saami saami व्हिडिओची एकच चर्चा

मुंबई : अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा' चित्रपटाने यशाचे अनेक विक्रम मोडले आहेत. कोरोनामुळे बंद पडलेले बॉक्स ऑफिस या चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या गर्दीने भरले. चित्रपटाची कथा आणि कलाकार तर जबरदस्त आहेतच पण त्यातील गाण्यांनीही धमाल केली आहे.

ज्याची भुरळ आता परदेशातील लोकांना ही पडते आहे. नुकताच या चित्रपटातील 'सामी सामी' गाण्याचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

मात्र, यात रश्मिका मंदान्ना किंवा अल्लू अर्जुन नाहीत. तर टांझानियन मुलगा किली पॉल ( kili paul ) दिसत आहे. जो या गाण्यावर त्याच्या अंदाजात परफॉर्म करताना दिसत आहे. 

टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉल ( kili paul ) याने पुन्हा एकदा या अप्रतिम व्हिडिओद्वारे चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रश्मिका मंदान्नाच्या सामी सामी या सुपरहिट गाण्यावर डान्स करतानाचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पुष्पा चित्रपटाचे हे गाणे खूपच हिट झाले आहे.

Read More