Marathi News> मनोरंजन
Advertisement

अखेर रश्मिका मंदान्नाचा खुलासा...! 'या' सुपरस्टारला डेट करतेय अभिनेत्री?

नॅशनल क्रश रश्मिका मंदान्नाने सोडलं रिलेशनशिपवर मौन

अखेर रश्मिका मंदान्नाचा खुलासा...! 'या' सुपरस्टारला डेट करतेय अभिनेत्री?

मुंबई : नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना आणि 'लाखो दिलो की धडकन' विजय देवरकोंडा एकमेकांना डेट करत आहेत? हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते खूप दिवसांपासून उत्सुक आहेत. 'कॉफी विथ करण 7'च्या वेळी करण जोहरने थेट विजयला याबद्दल विचारलं तेव्हा या गोष्ट अधिकच चर्चेत आली.

मात्र, विजयने यावर बोलणं टाळत सांगितलं की, आम्ही दोघं मित्र आहोत. विजयच्या या उत्तराने करण जोहर किंवा त्याचे चाहते समाधानी झाले नाहीत. हा प्रश्न तसाच राहिला. आता हाच प्रश्न रश्मिका मंदान्नाला विचारण्यात आला. जो प्रश्न विजय देवराकोंडाला विचारण्यात आला होता.

अलीकडेच,  दिलेल्या मुलाखतीदरम्यान रश्मिकाला विचारलं गेलं की, ती कोणाला डेट करत आहे. तेव्हा रश्मिका म्हणाली, "कधीकधी मी अशी असते की अरे यार... मी एका वर्षात पाच चित्रपट करते. पण आत्ता तुम्हाला माझ्याकडून सगळं जाणून घ्यायचं आहे. मी कोणाला डेट करत आहे? माझ्या वैयक्तिक आयुष्यात काय चाललं आहे.  मला समजतं की, आम्ही कलाकार आहोत आणि प्रत्येकाला आमच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे."

fallbacks

रश्मिका पुढे म्हणाली की, मी माझ्या करिअरच्या सुरुवातीपासून मी हे सगळं पाहत आली आहे. मी कोणाला डेट करत आहे किंवा मी कोणासोबत आहे? कलाकार लाइम लाइटमध्ये असतात आणि तुम्ही त्यांच्याबद्दल बोलू शकता. पण गोष्ट जेव्हा माझी येते, तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते की, जोपर्यंत मी स्वत: तुम्हाला गोष्टींची पुष्टी करत नाही तोपर्यंत कोणत्याही निष्कर्षावर जाऊ नका.

 अभिनेत्रीला विजयबद्दलच्या नात्याबद्दल विचारलं असता रश्मिका म्हणली की, मी तो एपिसोड आणि गोष्टी ऐकल्याही. मला ते खूप आवडलंही. पण मला असंही वाटतं की, या फक्त गोष्टी आहेत आणि मला असं वाटत नाही की, आपण लग्न करावं. होय, हे ठीक आहे की, लोकांना या गोष्टी करण्यात मजा येते. मग त्यांना ते करू द्या. रश्मिकाने देवराकोंडासोबतच्या तिच्या नातेसंबंधाची पुष्टी केली नाही किंवा नकारही दिला नाही. 

Read More