Rashmika Mandanna Trolled : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. रश्मिका ही मुळची कर्नाटक राज्यातील कुर्गची आहे. रश्मिकानं कन्नड चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण तिला सगळ्यात जास्त लोकप्रियता ही तमिळ चित्रपटसृष्टीतून मिळाली. तर दुसरीकडे गेल्या अनेक वर्षांपासून तिचे कन्नड चाहते हे तिच्यावर नाराज आहेत. त्याचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यात रश्मिका बोलताना दिसते की ती हैदराबादची आहे. त्यामुळे तिचे चाहते आणखी संतापल्याचे म्हटले जात आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ रश्मिकाच्या 'छावा' या चित्रपटाच्या प्री-रिलीज कार्यक्रमांमधील आहे. यात रश्मिका स्टेजवरून लोकांशी बोलताना दिसते. तिनं म्हटलं की कारण मी हैदराबादची आहे आणि मी एकटी आले आहे आणि त्यासोबत मला आशा आहे की मी तुमच्या सगळ्यांच्या कुटुंबाचा भाग बनू शकेल. यावर प्रेक्षकांनी टाळ्या वाजवल्या आणि रश्मिकानं त्यांना स्मित हास्य देत त्यांचे आभार मानले.
'@iamRashmika, I sometimes feel pity for you for receiving unnecessary negativity/targeting from our fellow Kannadigas.
— ViratRocky (@Virat_Rocky18) February 14, 2025
But when you make statements like this I think they are right and you deserve the backlash.#Kannada #Chaava #RashmikaMandanna pic.twitter.com/RBY7RcpHgP
रश्मिकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये सोशल मीडियावर शेअर करत एका नेटकऱ्यानं म्हटलं आहे की कधी-कधी मला तुझ्यावर असलेल्या कन्नड लोकांच्या निगेटिव्हीटीची दया येते. पण जेव्हा तू अशा प्रकारचे काही वक्तव्य करते तेव्हा मला वाटतं की ते योग्य आहेत आणि तू ट्रोल झालं पाहिजे.
हेही वाचा : 'चित्रपटाची शेवटची 40 मिनिटं...', 'छावा' पाहिल्यानंतर कतरिनाची विकीसाठी खास पोस्ट; कौशल कुटुंबाचा VIDEO व्हायरल
अनेकांनी कमेंट करत रश्मिकानं अशा प्रकारची वक्तव्य करणं ही सर्वसामान्य गोष्टी असल्याचं म्हटलं आहे. एकानं कमेंट केली की 'मला वाटतं की ती तेलगु प्रेक्षक आणि तेलगू चित्रपटसृष्टीमध्ये स्वत: स्थान मिळवण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. त्यासाठीच ती अशी वक्तव्य करते.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'काय मुलगी आहे, तिला असं बोलताना काही वाटतं पण नाही. काही लोकांनी यावर तिला पाठिंबा दिला. मात्र, जास्त लोकांनी रश्मिकाला चुकीचंच म्हटलं आहे.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'हे एक मोठं मार्केट आहे. त्यामुळे प्रामाणिकपणा पेक्षा हा एक उत्तम पर्याय आहे.'