Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हायरल : नवरात्रोत्सवानिमित्त अण्णा नाईंकाचा गरबा

लहान मुलाचा व्हिडिओ नेटीझन्सच्या पसंतीला 

व्हायरल : नवरात्रोत्सवानिमित्त अण्णा नाईंकाचा गरबा

मुंबई : आता सगळीकडे गरब्याची धूम आहे. लहानांपासून ते अगदी मोठ्यांपर्यंत सगळेच गरब्याच्या गाण्यांवर ठेका धरतात. नुकताच विकेंड झालाय अनेक ठिकाणी सोसायट्यांमध्ये गरब्याचे आयोजन केले जाते. गरब्यामध्ये 'वेशभूषा स्पर्धा' आयोजित करतात. अशावेळी मालिकांमधील लोकप्रिय पात्र निवडून त्यांची वेशभूषा करून स्पर्धेत उतरलं जातं. यातीलच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला आहे. 

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'रात्रीस खेळ चाले'मधील सर्वांच आवडतं कॅरेक्टर म्हणजे अण्णा नाईक. अण्णा नाईक हे जरी मोठ्या व्यक्तीचं कॅरेक्टर असलं तरीही लहान मुलांमध्ये देखील हे कॅरेक्टर लोकप्रिय आहे. त्यांची चालण्याची पद्धत, बोलण्याची लकब सगळ्यात हटके आहे. आणि ती प्रेक्षकांना भावते. तर हीच स्टाईल पक़ून चक्क एका लहान मुलाने वेशभूषा स्पर्धेत 'अण्णा नाईक' यांची वेशभूषा करून तेच बेअरिंग पकडून सगळ्यांना आनंद दिला. 

हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. झी मराठीवरील 'रात्रीस खेळ चाले' या मालिकेत अभिनेता माधव अभ्यंकर हे अण्णा यांच कॅरेक्टर प्ले करत आहे. 'रात्रीस खेळ चाले पर्व 2' देखील प्रेक्षकांना पसंत पडत आहे. यामध्ये तरूणपणीचे अण्णा दाखवले आहेत. त्यामुळे हे बेअरिंग पकडणं या लहान मुलाला सोपं गेलं असेल. हा व्हिडिओ कुठचा किंवा त्या मुलाचं नाव काय हे अद्याप कळलेलं नाही. पण याचे दोन व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

अण्णा नाईक असंय मी... असं म्हणतं हा मुलगा अभिनेता माधव अभ्यंकर यांची ऍक्टिंग करत आहे. अगदी अल्पावधीतच हे कॅरेक्टर लोकप्रिय झालं. 

Read More