Marathi News> मनोरंजन
Advertisement

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

जरा धीर म्हणून नाही तुम्हाला..., म्हणत शेवंता परत आलीये   

आजपर्यंत घायाळ केलं यावेळी जीवच घेईन.., असं कोणाला म्हणतेय शेवंता? पाहा व्हिडीओ

मुंबई : काही मालिकांतील पात्र प्रेक्षकांच्या काळजाचा ठाव घेतात. अर्थात त्यामागे कारणं वेगवेगळी असतात. कधी त्या कलाकाराचा अभिनय भावतो, कधी सौंदर्य तर, कधी मादक अदा. या साऱ्याचा मेळ घालत एक पात्र काही वर्षांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आणि बस्स मग काय, सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. 

झी मराठीवर (Zee Marathi) प्रदर्शित झालेल्या काही मालिकांमधीलच ही एक मालिका, रात्रीस खेळ चाले. अण्णा नाईक, नाईक कुटुंब आणि शेवंताभोवती फिरणारं कथानक मालिकेच्या जमेच्या बाजू. अशा या मालिकेच्या पहिल्या दोन पर्वांना मिळालेल्या यशानंतर आता तिसरं पर्वही (Ratris Khel Chale 3) प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. किंबहुना आता त्यासाठीचा काऊंटडाऊनच सुरु झाला आहे. कारण, खुद्द शेवंतानंच आपण परत येणार असल्याची ग्वाही एका प्रोमो व्हिडीओच्या माध्यमातून दिली आहे. 

का आली Bigg Boss फेम अभिनेत्रीला अटक करण्याची वेळ ? 

 

अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिनं साकारलेली शेवंता (shevanta) अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकवून गेली खरी. पण, आता मात्र काळजाचा ठोका चुकवायला नव्हे, तर थेट जीवच घ्यायला येतेय असंच सांगत शेवंतानं आपण परतणार असल्याची बातमी दिलीये. लालबुंद रंगाची नऊवारी साडी, तंग चोळी, सुडौल बांधा आणि त्यावर चार चाँद लावणारं सौंदर्य अशी शेवंता नेमकी कोणावर सूड उगवणार हाच प्रश्न आता चाहत्यांच्या मनात घर करु लागला आहे. 

'जरा धीर म्हणून नाही तुम्हाला...', असं म्हणत आपल्याच शैलीच प्रेक्षकांवर ही शेवंता भुरळ पाडतेय तर, दुसऱ्याच क्षणाला तिच्या नजरेत सूडाची भावना स्पष्टपणे दिसून येतेय. त्यामुळं मालिकेच्या या नव्या पर्वात नेमकं कथानक कोणत्या वळणाला जाणार याचीच उत्सुकता सध्या पाहायला मिळत आहे. ही उत्सुकता आता 16 ऑगस्टपर्यंत कायम असेल, कारण या दिवसापासून दर आठवड्याला सोमवार ते शनिवार रात्री 11 वाजता या मालिकेचं प्रसारण केलं जाणार आहे. 

Read More