Marathi News> मनोरंजन
Advertisement

Ratris Khel Chale 3 : 'भेटूयात लवकरच...' शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

शेवंता पुन्हा येणार.... 

Ratris Khel Chale 3 : 'भेटूयात लवकरच...' शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला

मुंबई : 'अण्णा नाईक परत येणार?' या पाठोपाठ आता 'शेवंता, पुन्हा दिसणार का?' अशी चर्चा रंगलीय. 'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेतील लोकप्रिय पात्र अण्णा आणि शेवंता पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोमवारी 22 मार्चपासून 'रात्रीस खेळ चाले 3' मालिकेचा पहिला भाग प्रदर्शित झाला. यामध्ये सगळ्यांची अण्णांसोबत भेट झाली. 

आता अण्णांपाठोपाठ शेवंता देखील प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. शेवंता म्हणजे अभिनेत्री अपूर्वी नेमळेकर प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.   

‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेच्या तिसऱ्या पर्वाचे आगमन झाले आहे. याच निमित्ताने मालिकेतील ‘अण्णा’, ‘शेवंता’ आणि ‘माई’ ही मुख्य पात्र पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. यातही ‘शेवंता’ साकारात घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर सध्या अधिक चर्चेत आहे. ‘रात्रीस खेळ चाले’ या मालिकेतील थरार, रहस्य या सगळ्याने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. त्यानंतर या मालिकेचा दुसरा भाग मिळाला.

त्यातही अण्णा नाईकांचा दराराही चांगलाच चर्चेत राहिला. त्यानंतर सगळ्यांचं लक्ष वेधलं ते शेवंताने. शेवंता हे पात्र या मालिकेत आलं आणि त्यानंतर अण्णा नाईक आणि शेवंता यांच्या जोडीची चर्चा झाली. आता तिसऱ्या भागातही अण्णांसोबतच शेवंताही पुन्हा भेटीला येत आहे. शेवंताची भूमिका साकारणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने नुकतच ती परत येणार असल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

Read More