Marathi News> मनोरंजन
Advertisement

Samantha Ruth Prabhu च्या घटस्फोटाचं कारण उघड, Naga Chaitanya ने लावली होती कठोर बंधन

नागा चैतन्य आणि समंथाने लग्नाच्या 4 वर्षांनंतर घेतला घटस्फोट 

Samantha Ruth Prabhu च्या घटस्फोटाचं कारण उघड, Naga Chaitanya ने लावली होती कठोर बंधन

मुंबई : गेल्या महिन्यात साऊथ इंडस्ट्रीमधून आलेल्या एका बातमीने सगळ्यांनाच हैराण केलं. ही बातमी आहे 'द फॅमिली मॅन' अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू आणि 'लाल सिंह चड्ढा' फेम अभिनेता नागा चैतन्य (Naga Chaitanya) यांनी घटस्फोट घेतला. या दोघांच्या चाहत्यांना घटस्फोटाच्या बातमीने खूप मोठा धक्का बसला. 

दोघांनी लग्नाच्या 4 वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला. आता मिळालेल्या माहितीनुसार, घटस्फोटानंतर लगेच सामंथाने (Samantha Ruth Prabhu)अल्लू अर्जून आणि रश्मिका मंदाना स्टारर सिनेमा 'पुष्पा'(Pushpa) मध्ये आयटम साँग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नागा चैतन्यपासून घटस्फोट घेताच समांथाने हा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. अशा स्थितीत चाहते असा कयास लावत आहेत की लग्नादरम्यान नागा हा खूप रूढिवादी व्यक्ती असावा आणि त्याने समंथावर अनेक बंधने लादली होती. 

त्यामुळेच समंथाने लग्नादरम्यान अशी भूमिका केली नाही. घटस्फोट घेताच समंथाने पुष्पासाठी आयटम साँग साइन केले. आता यामुळे सामंथा सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे. लोक नागा चैतन्यवर जुन्या विचारांचा व्यक्ती असल्याचा आरोप करत आहेत.

लोक म्हणतात की, सामंथाने याआधी अशा भूमिका कधी केल्या नव्हत्या. कदाचित नागाने सामंथावर बंदी घातली असेल. त्याचबरोबर काही लोकांनी नागा यांनाही पाठिंबा दिला आहे. नागाला पाठिंबा देणारे लोक म्हणतात की जर तो जुन्या विचारांचा माणूस असता तर त्याने कोणत्याही परिस्थितीत अभिनेत्रीशी लग्न केले नसते. नागा आणि सामंथा यांनी 2017 मध्ये लग्न केले होते आणि त्यानंतर 4 वर्षांनी या वर्षी 2 ऑक्टोबर रोजी घटस्फोटाची घोषणा केली होती.

Read More