Marathi News> मनोरंजन
Advertisement

पैशासाठी नाही तर 'या'साठी केले बायोपिकमध्ये काम- सनी लियोनी

सनी लियोनीचा जीवनप्रवास उलघडणारी वेब सिरीज सध्या चांगलीच गाजत आहे. 

पैशासाठी नाही तर 'या'साठी केले बायोपिकमध्ये काम- सनी लियोनी

मुंबई : सनी लियोनीचा जीवनप्रवास उलघडणारी वेब सिरीज सध्या चांगलीच गाजत आहे. या बायोपिकमधून सनीच्या आयुष्यातील अनेक रहस्यांचा उलघडा होत आहे. सनीचे आयुष्य किती संघर्षमय आणि नाट्यपूर्ण होते, याचा उलघडा यातून होत आहे. 

यात फक्त सत्य दाखवण्यात आले आहे

छबी सुधारण्यासाठी बायोपिकमध्ये काम केले का? असे विचारल्यावर सनीने सांगितले की, लोक माझ्याबद्दल काय काय विचार करतात, ते मला माहित नाही. पण यात फक्त सत्य दाखवण्यात आले आहे.
पूर्वीचे आयुष्य पुन्हा जगून कसे वाटले, या प्रश्नावर सनी म्हणते की, ही सिरीज शूट करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. मला नक्की काय वाटते, ते मी सांगू शकत नाही. दुसऱ्या सीजनमध्ये मी पूर्णपणे तुटले. आता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. बहिणीचा फायदा घेत सनीचा भाऊ कमवत होता पैसे...

तेव्हा मला कळलं नाही...

आयुष्यातील दुसरा पैलू पाहताना मला अश्रू अनावर झाले. माझी कहाणी मला माहित आहे. मी माझ्या आयुष्यात कसे निर्णय घेतले, हे मला ठाऊक आहे. माझ्या या निर्णयामुळे माझ्या कुटुंबावर आणि नातेवाईकांवर काय परिणाम होईल, हे समजण्या इतपत तेव्हा मी मानसिकरीत्या सक्षम नव्हते. ...आणि सनीने केले पहिले बोल्ड फोटोशूट!

 

सनीच्या आयुष्यातील विविध पैलू

पार्न स्टार ते बॉलिवूड अभिनेत्री असा प्रवास करणाऱ्या सनीची 'करनजीत कौर- द स्टोरी ऑफ सनी लियोनी' चा बायोपिक झी 5 वर प्रदर्शित झाला आहे. यात सनीच्या आयुष्यातील विविध पैलूंचे दर्शन होते. 

 

Read More
;