Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिकाच्या 'छपाक'ला मागे टाकत अजयच्या 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ची सुस्साट कमाई

'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक' हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत.

दीपिकाच्या 'छपाक'ला मागे टाकत अजयच्या 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ची सुस्साट कमाई

मुंबई : बॉक्सऑफिसवर १० जानेवारीला एकत्रच दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले. अजय देवगनचा (Ajay Devgn)  'तानाजी: द अनसंग वॉरियर' (Tanhaji: The Unsung Warrior) आणि दीपिका पदुकोणचा 'छपाक' (Chhapaak). चित्रपट प्रदर्शित होण्याआधी बॉक्सऑफिसवर हे दोनही चित्रपट एकमेकांना चांगलीच टक्कर देणार असल्याचं बोललं जात होतं. पण दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनानंतर अजयच्या 'तानाजी...'ने बॉक्सऑफिसवर सुस्साट कमाई करत 'छपाक'ला चांगलंच पछाडलं आहे. 

'बॉक्सऑफिस इंडिया'नुसार, 'तानाजी: द अनसंग वॉरियर'ने ओपनिंग डेलाच जवळपास १५.१० कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी हा 'तानाजी...'ने जवळपास २०.५७ कोटींचा गल्ला जमवला आहे. म्हणजेच बॉक्सऑफिसवर 'तानाजी...'ने दोन दिवसांत जवळपास ३५.६७ कोटींच्या कमाईचा आकडा पार केला आहे. 

'छपाक'ने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ४. ७७ कोटींची कमाई केली होती. तर दुसऱ्या दिवशी चित्रपटाच्या कमाईने ६.९० कोटींचा आकडा गाठला. दोन दिवसांत 'छपाक'ने जवळपास ११.६७ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

'तानाजी: द अनसंग वॉरियर' आणि 'छपाक' हे दोन्ही चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहेत. अजयच्या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची वीरगाथा दाखवण्यात आली आहे. तर दीपिकाच्या 'छपाक'मध्ये ऍसिड अटॅक पीडिता लक्ष्मी अग्रवालची कहाणी, तिचा संघर्ष दाखवण्यात आला आहे. 

Movie Review : 'तानाजी : द अनसंग वॉरियर'

 

fallbacks

ओम राऊत दिग्दर्शित 'तानाजी: द अनसंग वॉरियर'मध्ये अजय देवगनशिवाय सैफ अली खान, शरद केळकर, काजोल, नेहा शर्मा, पद्मावती राव यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तर मेघना गुलजार दिग्दर्शित 'छपाक'मध्ये दीपिकाशिवाय विक्रांत मेसी, मधुरजीत आणि अंकित बिष्ट प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. 

fallbacks

  

Read More