Marathi News> मनोरंजन
Advertisement

दीपिका-रणवीरचं रिसेप्शन कार्ड आलं समोर

दोन ठिकाणी होणार रिसेप्शन सोहळा

दीपिका-रणवीरचं रिसेप्शन कार्ड आलं समोर

मुंबई : बॉलिवूडचे कपल रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण यांच्या लग्नाची तयारी सध्या इटलीमध्ये सुरु आहे. लेक कोमो येथे यांचा हा विवाहसोहळा पार पडणार आहे. दीपिका-रणवीर दोघेही आपल्या कुटुंबासोबत इटलीला पोहोचले आहे. 14-15 नोव्हेंबर रोजी हा विवाह पार पडणार आहे. 

लग्नाची तयारी सुरु असतानाच दीपिका-रणवीर यांच्या मुंबईतील रिसेप्शन कार्ड आता समोर आलं आहे. दीपिका आणि रणवीर आपल्या मित्रांना आणि बॉलिवूडकरांना 28 नोव्हेंबरला मुंबईत रिसेप्शन देणार आहेत. ग्रँड हयात या हॉटेलमध्ये रात्री 8 वाजता हा रिसेप्शन रंगणार आहे. 

fallbacks
Pinkvilla Image

मुंबईमधील रिेसेप्शन पार्टी रणवीर सिंहच्या आई-वडिलांनी ठेवली आहे. तर 21 नोव्हेंबरला दीपिका तिचं होमटाउन असलेल्या बंगळुरु येथे रिसेप्शन पार्टी देणार आहे. दीपिकाचे आई-वडील ही पार्टी होस्ट करतील.

काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि रणवीरच्या लग्नाची तयारी सुरु असतानाचे फोटो समोर आले आहेत. लेक कोमो येथे जोरदार तयारी सुरु असून याबाबत अनेकांना उत्सूकता आहे. इटलीतील लेक कोमो येथील विला डेल बेलवियानेलो येथे हा विवाह सिंधी आणि दक्षिण भारतीय पद्धतीने होणार आहे.

Read More