Marathi News> मनोरंजन
Advertisement

अमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक

Rekha At The Archies Premiere : रेखा आर्चिस सिनेमाच्या प्रिमिअरला उपस्थित... अमिताभ बच्चन यांच्या नातवाचा सिनेमा चर्चेत. 

अमिताभ यांच्या नातवाला आशिर्वाद द्यायला पोहोचली रेखा.. पाहा ग्लॅमरस लूक

Rekha Look : नेटफ्लिक्स चित्रपट 'द आर्चीज'च्या भव्य प्रीमियरसाठी बॉलिवूडचे अनेक बडे स्टार्स फुल स्टाईलमध्ये पोहोचले. झोया अख्तर दिग्दर्शित या चित्रपटातून सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि खुशी कपूर पदार्पण करत आहेत. या सर्व स्टार्सशिवाय बॉलिवूडची ज्येष्ठ अभिनेत्री रेखाही सर्व कलाकारांना आशीर्वाद देण्यासाठी आली होती. अभिनेत्रीने तिच्या उपस्थितीने सर्व प्रसिद्धी चोरली.

बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री रेखा कायमच आपल्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. आता ही अभिनेत्री रेखा पुन्हा एकदा प्रसिद्धीच्या झोतात आली. ज्याला कारण आहे  अभिनेता अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या म्हणजे अगस्त्य नंदा याचा पहिला चित्रपट 'द आर्चीज'च्या प्रीमियरला हजेरी लावली होती. रेखा आजही अमिताभ बच्चनसोबतच्या कथित नात्यामुळे चर्चेत असते.

5 डिसेंबर 2023 रोजी मोस्ट अवेटेड सिनेमा 'द आर्चीस' च्या निर्मात्यांना एक भव्य प्रीमिअर शो होस्ट केला होता. यावेळी बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी यावेळी उपस्थित होते. यावेळी अनेक स्टारकिड्सचे कुटुंबीय उपस्थित होते. बॉलिवूड किंग खान म्हणजे शाहरुख खान देखील लेकीला सपोर्ट करण्यासाठी सहकुटूंब पोहोचला होता. 

अगस्त्यला पाठिंबा देण्यासाठी बच्चन कुटुंबही प्रीमियरच्या संपूर्ण काळात उपस्थित होते. या प्रीमियरमधील रेखाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. एका यूजरवर कमेंट करताना त्याने लिहिले की, 'आज खूप दिवसांनी अमिताभ बच्चन आणि रेखा समोरासमोर आले असतील.' आणखी एका यूजरने लिहिले की, 'रेखा नेहमीच खूप सुंदर दिसते.' आणखी एका युजरने लिहिले की, 'रेखाला खरोखरच स्पर्धा नाही. रेखा देखील मनाने खूप चांगली आणि खरी व्यक्ती आहे. ती सर्व लोकांमध्ये खूप वेगळी आणि सुंदर दिसते.

'या' वयातही ...

रेखा तिच्या काळातील सर्वात सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्रींपैकी एक आहे. वयाच्या 69 व्या वर्षीही लाखो लोकांच्या हृदयात तिचं तेच स्थान आहे. रेखा सिनेमांप्रमाणेच तिच्या खासगी आयुष्यामुळेही खूप चर्चेत राहिली आहे. मग तिचं लग्नो असो किंवा अमिताभ बच्चन यांच्यासोबतच नातं. या सर्व सेलिब्रिटींमध्ये रेखाच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. चित्रपटाच्या प्रीमियर रात्री रेड कार्पेटवर रेखाने पुन्हा एकदा आपल्या मोहक हास्याने सर्वांची मने जिंकली. या कार्यक्रमासाठी रेखाने सुंदर पोपटी रंगाची सिल्क साडी निवडली होती. 

Read More