Marathi News> मनोरंजन
Advertisement

व्हिडिओ : रेखानं अमिताभ यांच्या सुनेला मारली घट्ट मिठी

रेखा आणि ऐश्वर्या या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय

व्हिडिओ : रेखानं अमिताभ यांच्या सुनेला मारली घट्ट मिठी

मुंबई : बॉलिवूडची एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा नेहमीच आपल्या स्टाईल आणि लूकसाठी चर्चेत असतात. नुकत्याच त्या एका कार्यक्रमातून बाहेर पडताना दिसल्या. यावेळी त्यांच्यासोबत अमिताभ बच्चन यांची सून आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनदेखील दिसत होती. यावेळचाच या दोघींचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. या कार्यक्रमात रेखा आणि ऐश्वर्या पारंपरिक वेषात दाखल जाल्या होत्या. दोघींनीही पांढऱ्या आणि सोनेरी रंगाचे कपडे परिधान केले होते... आणि त्यावर दोघींचेही गोल्डन रंगाचे दागिने खुलून दिसत होते. 

सेलिब्रिटी फोटोग्राफर मानव मंगलानी आणि विरल भयानी यांनी या कार्यक्रमाचा व्हिडिओ आपल्या अकाऊंटवरून शेअर केलाय. या व्हिडिओत रेखा आणि ऐश्वर्या एकमेकींना घट्ट मिठी मारताना दिसत आहेत. 

यावेळी, रेखा यांनी हलकेच ऐश्वर्या हिच्या गालावर किस दिलं... आणि ऐश्वर्याला सोडण्यासाठी त्या तिच्या गाडीपर्यंत आल्या. परंतु, ऐश्वर्या हिनं रेखा यांना पहिल्यांदा कारमध्ये बसण्याची विनंती केली... आणि त्यानंतर ती तिथून निघाली. 

View this post on Instagram

#Rekha with #aishwaryaraibachchan

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on

उल्लेखनीय म्हणजे, नुकतंच ऐश्वर्या राय हिनं आपल्या बॉलिवूड करिअरचे २० वर्ष पूर्ण केल्याच्या निमित्तानं रेखा यांनी तिच्यासाठी एक खुलं पत्रंही लिहिलं होतं. रेखानं या पत्राची सुरुवात करताना 'माझी ऐश' असं ऐश्वर्याला संबोधलं होतं तर पत्राच्या शेवटी आपल्या नावाच्या जागी 'रेखा माँ' असा उल्लेख केला होता. 

रेखा आणि ऐश्वर्या यांचे हे जवळकीचं अनोखं नातं त्यांच्या फॅन्सला खूपच भावलंय. त्यामुळे, त्यांच्या या व्हिडिओवर कमेटसचा आणि लाईक्सचा अक्षरश: पाऊस पडताना दिसतोय. 

Read More