Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नानंतर 11 महिन्यात रेखा यांच्या पतीची आत्महत्या, पत्नीसाठी लिहिली Suicide note

अमिताभ बच्चन यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर रेखा यांचं लग्नही अपयशी, लग्नाच्या 11 महिन्यात पतीने केली आत्महत्या, कारण...   

लग्नानंतर 11 महिन्यात रेखा यांच्या पतीची आत्महत्या, पत्नीसाठी लिहिली Suicide note

Rekha Love Life: सौंदर्य, अदाकारी , मादकता या साऱ्याचं उत्तम समीकरण असणारी अभिनेत्री कोण? असा प्रश्न विचारला असता क्षणाचाही विचार न करता असंख्यजण एकच नाव घेतात. ते नाव म्हणजे रेखा (rekha). गेली कित्येक दशकं आपल्या सौंदर्याच्या अभिनयाच्या बळावर राज्य करणाऱ्या या अभिनेत्री रेखा यांनी प्रोफेशनल आयुष्यात यशाचं उच्च शिखर गाठलं, पण त्यांचं खासगी आयुष्य कायम अस्थिर राहिलं. 

रेखा यांच्या प्रेमप्रकरणांपासून अपयशी लग्नांपर्यंत (rekhas husband controversy) सर्वच गोष्टींमुळे रेखा यांचं खासगी आयुष्य अनेकांचं लक्ष वेधून गेलं. दिल्लीस्थित व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी रेखा विवाहबंधनात अडकल्या होत्या. पण, हे लग्न काही फार काळ टीकू शकलं नाही. अवघ्या काही महिन्यांच्या वैवाहिक आयुष्यानंतरच या नात्यात असं काही वादळ आलं की गोष्टी बदलून गेल्या. (Rekha husband committed suicide)

रेखा यांच्या जीवनावर आधारित काही प्रसंगांवर 'रेखा द अनटोल्ड स्टोरी' या पुस्तकात त्यांचं लग्न आणि पतीची आत्महत्येबद्दल यासिर उस्मान यांनी लिहिलं आहे. धक्कादायक म्हणजे रेखा यांच्या ओढणीने गळफास घेवून मुकेश अग्रवाल यांनी आयुष्य संपवलं. 

fallbacks

आत्महत्येपूर्वी मुकेश अग्रवाल यांनी रेखा यांच्यासाठी सुसाइड नोट लिहिली होती. सुसाइड नोटमध्ये मुकेश यांनी 'मी माझ्या संपत्तीमधील कोणताही हिस्सा रेखासाठी ठेवला नाही. मला विश्वास आहे, ती स्वतः सक्षम आहे...' (Rekha husband wrote suicide note)

रेखा यांच्या जीनवप्रसंगांवर प्रकाश टाकण्यात आलेल्या या पुस्तकात नमूद केल्यानुसार मुकेश आणि रेखा यांनी तिरुपती मंदिरात पुन्हा लग्नगाठ बांधली. यावेळी रेखा यांच्या आईवडिलांनी या विवाहसोहळ्याला हजेरी लावली होती. पुढे मुकेश यांना व्यवसायात तोटा झाला. ज्यानंतर त्यांच्या नात्यात दुरावा येऊ लागला.  (rekhas husband committed suicide)

लग्नाच्या जवळपास सहा महिन्यानंतरच रेखा यांनी मुकेश यांच्याकडे घटस्फोटाची कागदपत्र पाठवली होती. मुख्य म्हणजे त्यांनी यापूर्वी अनेकदा आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही या पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे. अखेरीस मुकेश यांनी फार्महाऊसवरच रेखा यांच्या ओढणीने गळफास लावून घेत आत्महत्या केली. (rekhas husband mukesh agrawal suicide)

Read More