Marathi News> मनोरंजन
Advertisement

भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं Ignore, अभिषेक बच्चनला मारली मिठी; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ

Rekha Akshay Kumar Video :  रेखा यांनी भर कार्यक्रमात केलं अक्षयकडे दुर्लक्ष, तर अभिषेक पाहताच मारली मिठी... व्हिडीओ होतोय व्हायरल

भर कार्यक्रमात रेखा यांनी अक्षयला केलं Ignore, अभिषेक बच्चनला मारली मिठी; वारंवार पाहिला जातोय व्हिडीओ

Rekha Akshay Kumar Video : बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या खासगी आयुष्यामुळे नेहमची चर्चेत असतो. त्यात त्याच्या भूतकाळाची सगळ्यात जास्त चर्चा होते. त्याचं नाव फक्त रवीना टंडनशी जोडण्यात आलेलं नाही तर तिच्यासोबत त्याचा साखरपुडा देखील झाला होता. मात्र, काही कारणांमुळे त्यांच लग्न मोडलं. याशिवाय अक्षयचं नाव हे शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्याशी जोडण्यात आलं होतं. तर शिल्पा शेट्टी आणि रेखा यांच्यासोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचं म्हटलं जातं. ब्रेकअपनंतर अक्षय हा त्याच्या एक्ससोबत कदाचित कधी दिसला असेल तर. दरम्यान, या सगळ्यात नुकताच एका कार्यक्रमातील व्हिडीओ समोर आला आहे. अक्षयनं शिल्पासोबत डान्स केला तर रेखा यांनी अक्षयकडे दुर्लक्ष केलं. 

अक्षय कुमार आणि रेखा यांच्या अफेअरच्या  चर्चा तर नेहमीच होतात. आता मुंबईमध्ये 3 मार्च रोजी झालेल्या एका कार्यक्रमात एक व्हिडीओ समोर आला आहे. या स्टेजवर रेखा या पुरस्कार देण्यासाठी असतात तर तेव्हाच क्रिकेटपटू शिखर धवनसोबत अक्षय कुमार स्टेजवर येतो. अक्षय पुढे आणि क्रिकेटपटू हा मागे असतो पण रेखा अक्षयकडे दुर्लक्ष करतात आणि शिखरच्या दिशेनं हात पुढे करतात. अक्षयच्या देखील हे लक्षात येतं आणि तो त्या दोघांच्या मागून दुसरीकडे निघून जातो. 

त्याशिवाय स्टेजवर नंतर अभिषेक बच्चन देखील येतो. तर त्याला पाहताच रेखा त्याला मिठी मारतात. तर दुसरीकडे अक्षय दोघांकडे पाहताना दिसला. रेखा या त्याच्याकडे लक्षच देत नाही आहेत आणि अभिषेकशी गप्पा मारताना दिसल्या. त्यावर आता नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एका नेटकऱ्यानं लिहिलं की 'रेखा यांनी अशा प्रकारे इग्नोर केलं त्यावरून कळतंय की किती वाईट पद्धतीनं त्यांचा ब्रेकअप केला आहे.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'अमिताभ बच्चन आता अभिषेककडून ब्लेजर आयुष्यभरासाठी उधार घेणार आहेत.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'जया बच्चन त्यांच्या मुलाला बोलत असतील की घरी ये तुला बघते.' आणखी एक नेटकरी म्हणाला, 'ते सगळं ठीक आहे, पण रेखानं अक्षयकडे का दुर्लक्ष केलं?'

हेही वाचा : जेव्हा खुद्द धनाढ्य रतन टाटांना अमिताभ यांच्याकडून घ्यावं लागलेलं कर्ज; बिग बींनी सांगितला 'तो' किस्सा

जेव्हा अक्षय आणि रेखाच्या अफेअरच्या चर्चा 1996 मध्ये सुरु झाल्या होत्या. रवीना टंडननं सिने ब्लिट्डला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं, 'मला वाटत नाही की अक्षयचा कधी रेखा यांच्याशी काही संबंध होता. खरंतर हे आहे की तो त्यांच्यापासून लांब पळायचा. अक्षयनं फक्त चित्रपटासाठी रेखा यांना सहन केलं होतं. कधीतर रेखा यांनी अक्षयसाठी घरून डब्बा मागवायचा होता. तेव्हा मी नकार दिला होता. मला वाटलं की हे थोडं जास्तच पुढे जातयं.' 

Read More