Marathi News> मनोरंजन
Advertisement

रेखाने माधुरीला केलं KISS, 'डान्स दीवाने 3'च्या सेटवरील फोटो व्हायरल

'डान्स दीवाने 3' या रियालिटी शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमधील स्पर्धेकांचे एकापेक्षा एक असे दमदार परफॉर्म्नस प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर खिळवून ठेवत आहेत. धक-धक गर्ल माधुरी दीक्षित या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये बऱ्याचदा बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसून येतंय.

रेखाने माधुरीला केलं KISS, 'डान्स दीवाने 3'च्या सेटवरील फोटो व्हायरल

मुंबई : 'डान्स दीवाने 3' या रियालिटी शोची सध्या सगळीकडेच चर्चा आहे. या शोमधील स्पर्धेकांचे एकापेक्षा एक असे दमदार परफॉर्म्नस प्रेक्षकांना टेलिव्हिजन स्क्रिनवर खिळवून ठेवत आहेत. धक-धक गर्ल माधुरी दीक्षित या शोमध्ये परिक्षकाच्या भूमिकेत आहे. या शोमध्ये बऱ्याचदा बॉलिवूडमधील दिग्गज सेलिब्रिटी हजेरी लावताना दिसून येतंय.

नुकतीच या मंचावर एव्हरग्रीन ब्युटी अभिनेत्री रेखा यांनी हजेरी लावली. त्याचा एक फोटो समोर आला आहे. ज्यात धक-धक गर्ल माधुरी दीक्षित आणि रेखा यांच्यात जबरदस्त बॉण्डिंग दिसून येत आहे. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)


रेखाने डान्स दिवानेच्या मंचावर आणली बहार

धक-धक गर्ल माधुरी दीक्षितचा रेखा यांच्यासोबत एक फोटो शेअर करण्यात आला आहे. ज्यात रेखा माधुरीला किस करताना दिसत आहेत. हा फोटो चांगलाच व्हायरल होत आहे. बी-टाऊनमधील या दोन अभिनेत्रींमधील बॉण्डिग या मंचावर पाहायला  मिळाली. दोन्ही अभिनेत्रींनी हा भाग आणखीनंच रंजक बनवला.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ColorsTV (@colorstv)


रेखाच्या घायाळ करणाऱ्या अदा

डान्स दीवानेच्या मंचावर रेखा आपल्या हिट गाण्यावर परफॉर्म करणार आहे. कलर्सच्या इंस्टाग्राम पेजवर रेखा यांच्या एन्ट्रीचा एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे. हा प्रोमो सध्य़ा सगळ्यांच लक्षवेधून घेणारा आहे. त्यांच्या घायाळ करणाऱ्या अदांनी चाहते पुन्हा एकदा रेखा जींच्या प्रेमात पडले आहेत.

 

Read More