Marathi News> मनोरंजन
Advertisement

1982 च्या रेखा- धर्मेंद्रची जोडीसुद्धा 'महाभारत' फेम अभिनेत्यापुढे ठरली फिकी; अभिनेत्रीच्या सौंदर्याचीही चर्चाच नव्हती...

Rekha's Movie Where Dharmendra Played Double Role : रेखा यांच्या या सुपरहिट चित्रपटात धर्मेंद्र यांनी साकारली दुहेरी भूमिका पण लक्ष वेधलं 'महाभारत' फेम अभिनेत्यानं

1982 च्या रेखा- धर्मेंद्रची जोडीसुद्धा 'महाभारत' फेम अभिनेत्यापुढे ठरली फिकी; अभिनेत्रीच्या सौंदर्याचीही चर्चाच नव्हती...

Rekha's Movie Where Dharmendra Played Double Role : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे जगभरात लाखो चाहते आहेत. त्यांनी वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. गेल्या तब्बल 6 दशकांपासून ते बॉलिवूडमध्ये सक्रिय आहेत आणि आजही ते चित्रपटांमध्ये काम करताना दिसतात. त्यांचे काही चित्रपट आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात छाप सोडली आहे. त्यापैकी रेखा यांच्यासोबत तर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यापैकी त्यांचा एक चित्रपट म्हणजे ज्यात त्यांनी दुहीरी भूमिका साकारली होती. हा चित्रपट त्या काळातील सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये 11 व्या स्थानी होता. या चित्रपटात धर्मेंद्र यांनी केलेल्या कामाची सगळीकडे चर्चा सुरु होती. आज आपण याच चित्रपटाविषयी जाणून घेणार आहोत. 

धर्मेंद्र यांची दुहेरी भूमिका

धर्मेंद्र आणि रेखा यांचा 'गजब' हा चित्रपट तुम्हाला आठवतोय का? या चित्रपटात धर्मेंद्र यांनी डबल रोल यासाठी साकारले कारण ती पटकथेची मागणी हती. एक साधाभोळा ग्रामीण तरुण आणि दुसरा त्यांचा जुळा भाऊ जो शहरात राहणार आणि त्यासोबत हुशार देखील. त्यामुळे दुहेरी भूमिका ही त्यासाठी खूप महत्त्वाची होती. 

धर्मेंद्र यांनी त्यांच्या करिअरमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. पण 1982 मध्ये आलेल्या ‘गजब’ या चित्रपटामधील भूमिकेनं सगळ्यांची मने जिंकली. सगळीकडे त्यांची स्तुती सुरु होती. या चित्रपटाची पटकथा हे दोन्ही भावांच्या अवतीभोवती फिरते पण असं असलं तरी त्या दोघांचं व्यक्तीमत्त्व हे फार वेगळं आहे. अशात एकाच अभिनेत्याला दोन अशा वेगळ्या भूमिका साकारणं किती कठीण असतं त्यामुळे सगळ्यांना खूप कौतूक वाटलं. चित्रपटात एका धर्मेंद्रचं निधन होतं आणि दुसरा त्याचा सूड घेतलो. दुहेरी भूमिका साकारून धर्मेंद्र यांनी प्रेक्षकांची मने जिंकली.  

कोणी वेधलं सगळ्यांचं लक्ष?

1980 च्या दशकात प्रत्येक दिग्दर्शक आणि निर्मात्याला धर्मेंद्र आणि रेखा यांना एकत्र घ्यायचं होतं. त्या दोघांची जोडी ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत होती. ते लक्षात घेत धर्मेंद्र यांची दुहेरी भूमिका ठेवली होती. आधी निर्मात्यांना या चित्रपटात शशि कपूर यांना घ्यायचं होतं पण त्यानंतर धर्मेंद्र यांना या चित्रपटात घेण्यात आलं आणि त्यांना प्रतिभा दाखवण्याची संधी मिळाले. चित्रपटात धर्मेंद्र यांच्यासोबत रेखा दिसल्या. मात्र, या दोघांच्या जोडीपेक्षा सगळ्यात जास्त कसली चर्चा झाली असेल तर ती म्हणजे 'महाभारत' मध्ये भीमच्या भूमिकेत दिसलेले प्रवीन कुमार यांच्या अभिनयानं. त्यांच्या अभिनयासमोर रेखा आणि धर्मेंद्र यांची जोडी फिकी ठरली. 

हेही वाचा : भारतात सगळ्यात जास्त मानधन घेणारा TV अभिनेता; 8 वर्षांनंतर कमबॅक 1 दिवसासाठी घेतो तब्बल 3.50 लाख

या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय रेखा, मदन पुरी, रंजीत, प्रवीन कुमार दिसले. या सगळ्या कलाकारांच्या भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या. धर्मेंद्र यांच्या या चित्रपटाचे आजही लोकांना पाहायला आवडतो. हा चित्रपट तर हिट झाला त्यासोबत चित्रपटाचे गाणे देखील खूप हिट झाले.  

Read More