Silsila Movie Rekha-Amitabh Bachchan : बॉलिवूड दिग्गज अभिनेत्री रेखा यांच्या सुंदरतेविषयी नेहमीच चर्चा होत असते. त्यांच्या चित्रपटांसोबत त्यांचं खासगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत राहिलं आहे. त्यांचं नाव हे अनेक अभिनेत्यांसोबत जोडण्यात आलं मात्र, सगळ्यात जास्त चर्चा ही अमिताभ यांच्यासोबतच्या नात्याविषयी होती. खरंतर रेखा या अनेकदा त्यांच्या मुलाखतींमध्ये स्पष्ट वक्तव्य करताना दिसतात. अशाच एका मुलाखतीत रेखा यांनी 'सिलसिला' या चित्रपटाच्या शूटचा एक किस्सा सांगितला होता.
रेखा यांच्यासोबत या चित्रपटात अमिताभ बच्चन दिसले होते. रेखा यांनी 'रेडिफ' ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की 'सिलसिला' या चित्रपटात एक इंटेस सीन होता. हा सीन सकाळी 5 वाजता शूट होणार होता. तर जिथे हा चित्रपट शूट झाला तिथे 15 हजार लोकं होतं. इतक्या लोकांसमोर हा सीन शूट करण्यात आला. त्यात त्यांच्या अनेक लाइन्स आणि रडणं होतं. लाइन्स अर्थात डायलॉग तर मोठे आणि जास्त होते. त्यामुळे रेखा यांनी तयारी करण्यासाठी यश चोप्रा यांच्याकडून थोडा वेळ मागितला. पण त्यांनी त्यासाठी नकार दिला.
अमिताभ यांनी रेखा यांना समजावलं की चित्रपट 'जायंट' मध्ये जेम्स डीन अशाच एका परिस्थितीत अडकले होते. मग काय ते वळले आणि गर्दीसमोरच त्यांनी लघवी केली. त्यावेळी जेम्स डीन यांनी मनात विचार केला की 'यापेक्षा अजून काय वाईट होऊ शकतं? आणि त्यानंतर त्यांनी एक परफेक्ट शॉट दिला.'
हेही वाचा : चित्रपटात रडण्यारीची भूमिका साकारली अन् एका रात्रीत झाली सुपरस्टार; 90 च्या दशकातील 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?
रेखा यांना कळलं आणि जेव्हा कॅमेरा सुरु झाला तेव्हा सगळे चूप झाले आणि रेखा यांनी जो सीन दिला तो चांगलाच गाजला. रेखा म्हणाल्या की 'सगळ्यात शेवटी मी अमिताभ यांना मठी मारली आणि सगळे म्हणाले ओह्हह.' दरम्यान, 'सिलसिला' अमिताभ आणि रेखा यांच्यासोबत एक अखेरचा चित्रपट होता. या चित्रपटाची पटकथा ही लव ट्रायंगलवर आधारीत होती. या चित्रपटाला यश चोप्रानं दिग्दर्शित केलं आहे. या चित्रपटात अमिताभ, रेखा आणि जया बच्चन एकत्र दिसल्या.