Rekha And Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन आणि रेखा यांचं नातं बॉलिवूडमध्ये सगळ्यात चर्चेत राहिलेलं आहे. मग त्याची ऑनस्क्रिन केमिस्ट्री असो किंवा मग ऑफ-स्क्रीन डेटिंडची अफवा. दोघं आजही लाइमलाइटमध्ये होते. त्यांच्या ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीनंतर तर सगळ्यांची मने वेधली. ज्याविषयी आजही चर्चा होते. अशीच एक गोष्ट दिग्दर्शक रंजीत यांनी स्वत: सांगितली होती.
बॉलिवूड शादीजनं दिलेल्या माहितीनुसार, 2015 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत रंजीत यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या डायरेक्टोरियल डेब्यूमध्ये रेखा यांना घ्यायचा ते विचार करत होते. पण रेखा यांना त्यांचा काळ हा अमिताभ यांना द्यायचा होता, त्यामुळे त्यांनी नकार दिला. एक प्रतिष्ठित खलनायकाच्या रुपात रंजीत स्वत: ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यानंतर त्याने निर्देशक होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर त्याने त्याच्या पहिल्या चित्रपट 'कारनामा'साठी एक स्क्रिप्ट लिहिली. ज्यामध्ये धर्मेंद्र, रेखा आणि जया प्रदा यांना चित्रपटाची ऑफर दिली.
रंजीतने सांगितले की, रेखा त्यांची खूप चांगली मैत्रीण होती. कारण रंजीतने त्याच्या पहिला चित्रपट 'सावन भादों'मध्ये रेखासोबत आपल्या आयुष्यातील पहिला सीन दिला होता. तेव्हापासून त्यांची मैत्री आहे. त्यामुळे रेखा रंजीतच्या 'कारनामा' चित्रपटात काम करण्यासाठी तयार झाली होती. मात्र, त्यानंतर असे काही झाले त्यामुळे चित्रपटाचे शेड्यूल बिघडले.
अर्ध्यातच सोडला होता चित्रपट
त्यावेळी रंजीतने सांगितले होते की, अभिनय सोडल्यानंतर त्याने एक स्क्रिप्ट लिहिली. त्यानंतर धर्मेंद्र, रेखा आणि जया प्रदा यांच्यासोबत चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात झाली. पहिला सीन हा संध्याकाळी शूट करायचा होता. त्याच्या आधीच रेखा रंजीतकडे गेली आणि तिने संध्याकाळचे शूटिंग हे पुढच्या दिवशी सकाळी करण्याची मागणी केली. कारण तिला तिची संध्याकाळ मोकळी ठेवायची होती आणि ती अमिताभ बच्चन यांच्यासोबत घालवायची होती. यानंतर रंजीतने तिला समजावून सांगितले की वेळापत्रक बदलल्यास त्याचा इतर कलाकारांवरही त्याचा परिणाम होईल. म्हणून तिने नम्रपणे नकार दिला. त्यानंतर रेखाने अमिताभ बच्चन यांच्यासोबत वेळ घालवण्यासाठी चित्रपट करण्यास नकार दिला.