Marathi News> मनोरंजन
Advertisement

अदार जैनच्या लग्नात सगळ्यांच्या नजरा रेखावरच खिळल्या; साडीचा थेट संबंध बिग बींशी

Adar Jain Wedding: आदर जैन आणि अलेखा आडवाणी दोघं लग्नाच्या बंधनात अडकले आहेत. दोघांच्या लग्नात अनेक कलाकारांनी उपस्थित दाखवली होती. अभिनेत्री रेखाचा यावेळी जलवा इतका होता की, आताच्या अभिनेत्रींकडे देखील कुणाच्या लक्ष नव्हतं. 

अदार जैनच्या लग्नात सगळ्यांच्या नजरा रेखावरच खिळल्या; साडीचा थेट संबंध बिग बींशी

आदर जैन आणि अलेखा आडवाणी या दोघांनी अतिशय धुमधडाक्यात मुंबईत नुकतंच लग्न झालं. अदार आणि अलेखा यांनी जवळच्या व्यक्तींसमोर सात फेरे देखील घेतले. या लग्नाला कपूर कुटुंबाचे सगळे नातेवाईक उपस्थित होते. याशिवाय सुहाना खान, अनन्या पांडे आणि बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री रेखा यांनीही लग्नाला हजेरी लावली. विरल भयानी यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर अभिनेत्रीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. रेखाने लग्नात खूप सुंदर साडी नेसली होती, ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत होती. तिने तिच्या पारंपारिक साडी आणि जड दागिन्यांसह आपलं सौंदर्य खुलवलं आहे.

रेखाने यावेळी लाल लिपस्टिक आणि गडद मस्कारा देखील घातला होता. तिने तिचा लूक एका सुंदर गुलाबी आणि सोनेरी मांग टिक्काने पूर्ण केला. 70 वर्षीय अभिनेत्रीने तिच्या लूकने लग्नाला उपस्थित असलेल्या सर्व बॉलिवूड अभिनेत्रींना मागे टाकले.  रेखाने 2005 मध्ये ब्लॅक चित्रपटाच्या प्रीमियरसाठी तीच साडी परिधान केली होती. या चित्रपटात राणी मुखर्जी आणि अमिताभ बच्चन यांनी काम केले होते. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यान, अभिनेत्रीने तिचा लूक पूर्ण करण्यासाठी या साडीला जाड मोत्याच्या कानातले आणि लाल आणि पांढऱ्या बांगड्या घालून सजवले. त्याच्या व्हिडिओवर चाहते प्रतिक्रिया देत आहेत.

करिना कपूरची मावशी रिमा जैन यांचा मुलगा आधार जैन आता अलेखा अडवाणीचा नवरा झाला आहे. काल रात्री मुंबईत मोठ्या थाटामाटात या जोडप्याचे लग्न झाले. हारांच्या देवाणघेवाणीनंतर दोघांनीही फेऱ्या मारल्या. या लग्नात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. पण सदाबहार अभिनेत्री रेखाच्या सौंदर्यासमोर सगळेच फिके पडले आहेत. 

अनन्या पांडे अलेखा आणि आदरच्या लग्नात ट्रेडिशनल लूकमध्ये दिसली. यावेळी तिने लाल रंगाची अतिशय हेवी अशी साडी परिधान केली होती. 

साडीचा थेट संबंध अमिताभ यांच्याशी 

ब्लॅक सिनेमाच्या प्रिमियरला रेखा यांनी हीच साडी नेसली होती. 20 वर्षांनंतरही रेखा यांचा हा लूक अतिशय खास आहे. रेखा यांचा या साडीतला अमिताभ बच्चन यांच्यासोूत फोटो आहे. या फोटोत रेखा अमिताभ यांच्यासमोर नजर खाली करुन बोलताना दिसत आहे. 

Read More