Marathi News> मनोरंजन
Advertisement

'पद्मावत'च्या वादावर रेणुका शहाणे यांची पोस्ट व्हायरल

एकीकडे देशात 'पद्मावत' सिनेमाचा वाद सुरु असतांना बॉलिवूडच्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी या वादावर आपलं मत मांडलं आहे.

'पद्मावत'च्या वादावर रेणुका शहाणे यांची पोस्ट व्हायरल

मुंबई : एकीकडे देशात 'पद्मावत' सिनेमाचा वाद सुरु असतांना बॉलिवूडच्या अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी या वादावर आपलं मत मांडलं आहे.

चित्रपटाला विरोध कायम

चित्रपट २५ जानेवारी रिलीज होणार आहे. पण अजून वाद संपलेला नाही. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर ही चित्रपटाला विरोध कायम आहे. अनेक सिनेमागृहांच्या मालकांनी भीतीपोटी सिनेमा न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.

पद्मावतला पाठिंबा

चित्रपटाला होणारा विरोध अनेकांना पटत नाही. त्यामुळं चित्रपटाला अनेकांनी पाठिंबा देखील दर्शवला आहे. सोशल मीडियावर अनेक कलाकारांनी या चित्रपटाला पांठीबा दर्शवला आहे. 'पद्मावत' नव्हे तर स्त्री-भ्रूण हत्या, महिलांची छेडछाड, बलात्कार या गोष्टींना देशात बॅन करण्याची जास्त गरज असल्याचं अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी फेसबुकवर एका पोस्टच्या माध्यमातून म्हटलं आहे.

दुसरे अनेक गंभीर मुद्दे

'पद्मावत' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध आहे.  याच पार्श्वभूमीवर रेणुका शहाणे यांनी देशात यापेक्षाही काही महत्त्वाचे आणि गंभीर मुद्दे असल्याचं म्हटलं आहे. रेणुका शहाणे यांनी शेअर केलेली ही फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Read More