Marathi News> मनोरंजन
Advertisement

Sexism वर रिचा चड्ढाचं मोठं वक्तव्य म्हणाली...

Richa Chaddha नेहमीच फिल्म इंडस्ट्री आणि त्या बाहेरील Sexism बद्दल आवाज उठवत असते.

Sexism वर रिचा चड्ढाचं मोठं वक्तव्य म्हणाली...

मुंबई : Richa Chaddha नेहमीच फिल्म इंडस्ट्री आणि त्या बाहेरील Sexismबद्दल आवाज उठवत असते. नुकतंच तिने केवळ फिल्म इंडस्ट्रीतच नव्हे तर मोठ्या प्रमाणात समाजात Sexism ही डिफॉल्ट वर्तणूक कशी आहे याबद्दल बोलली.

रिचाने नुकतीच निर्माती म्हणून सुरुवात केली आहे आणि तिला तिच्या प्रोजेक्टसाठी फक्त महिला स्टाफ घ्यायचा आहे. गर्ल्स विल बी गर्ल्स या तिच्या पहिल्या निर्मितीसाठी  फीमेल स्टाफ  शोधण्याचा ती प्रयत्न करत होती. तेव्हा तिच्या लक्षात आलं की,  लाइटिंग डिपार्टमेंटमध्ये महिलांची कमतरता आहे. 'गर्ल्स विल बी गर्ल्स'च्या दिग्दर्शक सुची तलाटी यांनी आता लाइटिंग विभागातील १० महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी अंडरकरंट लॅब कार्यशाळा सुरू केली आहे. यातील दोघांना ती या चित्रपटात संधी देणार आहे.

Sexism सामान्य आहे
एखाद्या चित्रपटाच्या सेटवर स्त्री तंत्रज्ञांना  Sexismचा सामना करताना तिने कधी पाहिलं आहे का असं विचारलं असता, ती म्हणाली, "Sexism ही आपल्या समाजाची डिफॉल्ट सेटिंग आहे. हे अतिशय सामान्य वर्तन आहे. महिलांचा समावेश करून आम्ही त्यात हळूहळू वाढ करत आहोत." बदलण्याची आशा आहे. बदल खरोखर कसा सुरू होतो. मला तेच करायचे आहे."

महिलांना लाइटिंग इक्विपमेंट हाताळण्यासाठी प्रशिक्षण देणाऱ्या वर्कशॉपबद्दल ऋचा म्हणाली, ''हा अनुभव खूप छान आहे. मुळात हे असं क्षेत्र आहे जिथे पुरुषांपेक्षा कमी महिला होत्या. म्हणून आम्ही ते सुरू केलं आणि आता मुली खरोखर शिकत आहेत. आम्ही खरोखरच शिकत आहोत. आनंद वाटत आहे. आम्ही हे केवळ प्रकाशयोजनेसाठीच नाही तर पुढील काही विभागांसाठीही सुरू ठेवण्यास उत्सुक आहोत."

Read More