Marathi News> मनोरंजन
Advertisement

अली फजल-रिचा चड्ढाचा वेडिंग प्लान ठरला

फुकरे सिनेमातून समोर आली जोडी 

अली फजल-रिचा चड्ढाचा वेडिंग प्लान ठरला

मुंबई : अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चड्ढा यांच्या लग्नासंदर्भात बी-टाऊनमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. हे दोघं लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. 'फुकरे' आणि 'फुकरे रिटर्न' सिनेमातून प्रेक्षकांसमोर आलेली ही जोडी लवकरच खासगी आयुष्याला सुरूवात करणार आहेत. या दोघांच्या लग्नाचा प्लान समोर आला आहे. 

या दोघांनी बांद्रा येथील फॅमिली कोर्टात लग्नासाठी अर्ज केला आहे. 15 फेब्रुवारीला अर्ज केल्यामुळे 15 मार्च ही लग्नाची तारीख त्यांना देण्यात आली आहे. पण या दरम्यान दोघंही सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे एप्रिल महिन्यात लग्नबेडीत अडकणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by ali fazal (@alifazal9) on

31 मार्चपर्यंत दोघंही सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्यानंतर तयारीकरता थोडा वेळ घेऊन एप्रिल महिन्याच्या मध्ये हे दोघं लग्न करणार आहेत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Power

A post shared by ali fazal (@alifazal9) on

कोर्टात लग्न झाल्यानंतर दोघंही मुंबईत रिसेप्शन देणार असल्याचं सांगण्यात येत आहे. या दोघांच्या लग्नाबाबत चाहते प्रचंड उत्सुक आहेत यात शंका नाही. आता हे लग्न कोणत्या पारंपरिक पद्धतीने होणार याकडे साऱ्यांच लक्ष लागून राहिलं आहे. 

Read More