Marathi News> मनोरंजन
Advertisement

लग्नघटिका आली समीप, ऋषी कपूर लवकरच परतणार मायदेशी?

अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत.

लग्नघटिका आली समीप, ऋषी कपूर लवकरच परतणार मायदेशी?

मुंबई : गेल्या वर्षभरापासून बॉलिवूडमध्ये लग्न सराईचं वादळ आहे. अनेक प्रसिद्ध कलाकार गत वर्षी विवाह बंधनात अडकले. सध्या अभिनेत्री आलिया भट्ट आणि अभिनेता रणबीर कपूरच्या लग्नाच्या चर्चा चांगल्याच रंगत आहेत. काही दिवसांपूर्वी आलियाने तब्बल १३ कोटी रूपयांचे घर घेतले आहे. शिवाय ऑगस्टमध्ये रणवीरचे वडील आणि प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर भारतात परतणार आहेत. ते त्यांच्या आजारवर बाहेरगावी उपचार घेत आहेत. यासर्व गोष्टींवरून आलिया आणि रणबीर लवकरच लग्न बंधनात अडकणार असण्याचे अंदाज वर्तवण्यात येत आहेत. 

नुकताच आलियाने सब्यसाचीकडून एक लेहंगा ऑर्डर केला आहे. आलिया आणि रणबीर २०१८ पासून एकमेकांना डेट करत असून २०२० मध्ये विवाहबंधनात अडकणार असल्याचंही सांगण्यात आले आहे. यापूर्वी सब्यसाची मुखर्जीने बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोण, प्रियांका चोप्रा आणि अनुष्का शर्मा यांच्या लग्नातील कपडे डिझाइन केले आहेत.

काही दिवसांपूर्वीच भट्ट आणि कपूर कुटुंब लग्नाची तारीख ठरवण्यासाठी भेटले होते. आलिया आणि रणबीरचा आगामी ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा दिग्दर्शक अयान मुखर्जी असून आलिया आणि रणबीर या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसतील. 

Read More