Marathi News> मनोरंजन
Advertisement

'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर

वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत.

'बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' म्हणत ऋषी कपूरनी शेअर केलं '102 नॉट आऊट'चं पोस्टर

मुंबई : वयाच्या 76 व्या वर्षीदेखील बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन उत्साहाने काम करत आहेत. नुकतेच त्यांनी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपटाच्या शूटिंगचं एक शेड्युल पार पाडलं. आता लवकरच ऋषी कपूर यांच्यासोबत '102 नॉट आऊट' या चित्रपटामध्ये ऋषी कपूर यांच्यासोबत बीग बीदेखील झळकणार आहे. या चित्रपटाची पहिली झलक रसिकांसमोर नुकतीच आली आहे. 

27 वर्षांनी ऋषी कपूर आणि बीग बी येणार एकत्र 

नुकतेच ऋषी कपूर यांनी '102 नॉट आऊट' या चित्रपटाचे पोस्टर ट्विटरवर शेअर केले आहे. यामध्ये ऋषी कपूर आणि अमिताभ बच्चन दोघेही खास अंदाजामध्ये दिसत आहेत. 

 

'अमर अकबर अ‍ॅंथेनी' या सुपरहीट हिंदी सिनेमानंतर तब्बल 27 वर्षांनी ऋषी कपूर पुन्हा अमिताभ बच्चनसोबत झळकणार आहेत. 'अमर अकबर अ‍ॅंथेनी' या चित्रपटामध्ये एकमेकांपासून दुरावलेले भाऊ या रूपात दिसलेले  ऋषी कपूर आणि बीग बी आता '102 नॉट आऊट' मध्ये मुलगा आणि वडील अशा भूमिकांमध्ये दिसणार आहेत.  

ऋषी कपूर यांचा खास अंदाज  

'102 नॉट आऊट' या चित्रपटाचे पोस्टर शेअर करताना ऋषी कपूर यांनी खास मेसेज लिहला आहे. यामध्ये ' बाप कूल, बेटा ओल्ड स्कूल' अशी खास टॅग लाईन लिहली आहे. 4मेला या बाप-लेकाच्या जोडीसोबत धमाल करायला या. 27 वर्षांनी बीग बींसोबत येणार आहे. असे त्यांनी लिहले आहे. 4 मे रोजी हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. 


'102 नॉट आऊट' चा खास टीझर 

 

'102 नॉट आऊट' या चित्रपटाचा टीझरदेखील रसिकांच्या भेटीला आला आहे. टीझर पाहून चाह्त्यांच्या मनात चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे. या चित्रपटात वडील 102 वर्षांचे आहेत, त्यांची जीवनाकडे पाहण्याची वृत्ती फार सकारात्मक आहे. तर वडिलांच्या निम्म्या वयाचा असणारा मुलगा जीवनाकडे मात्र फार नकारात्मक भावनेने पाहत आहे. उमेश शुक्ला यांनी या  चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

Read More