Marathi News> मनोरंजन
Advertisement

ऋषी कपूर यांचा लवकरच रुपेरी पडद्यावर 'कमबॅक'

'या' चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला

ऋषी कपूर यांचा लवकरच रुपेरी पडद्यावर 'कमबॅक'

मुंबई : बॉलिवूड ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर सध्या न्यूयॉर्कमध्ये त्यांच्या आजारावर उपचार घेत आहेत. यादरम्यान बी टाउनमध्ये ऋषी कपूर पुन्हा रुपेरी पडद्यावर वापसी करणार असल्याची माहिती समोर आली आहे. ऋषी कपूर 'झूटा कही का' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. या चित्रपटाचं पहिलं पोस्टरही प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवरुन चित्रपटाचं पहिलं पोस्टर शेअर केलं आहे. या पोस्टरमध्ये ऋषी कपूर यांच्याव्यतिरिक्त जिमी शेरगिल, सनी सिंह, ओमकार कपूरही दिसत आहेत. चित्रपटात मनोज जोशी आणि लिलेट दुबे हे कलाकारही प्रमुख भूमिका साकारणार आहेत. 

समीप कंग दिग्दर्शित 'झूटा कही का' येत्या १९ जुलै रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

Read More