Marathi News> मनोरंजन
Advertisement

कोण आहेत हे Footage खाणारे 'दादा- वहिनी'? सलमानच्या पार्टीत एंट्री होताच काय घडलं पाहा Video

थोडक्यात काय, तर ही जोडी कायमच सर्वांच्या पसंतीस का उतरते हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं

कोण आहेत हे Footage खाणारे 'दादा- वहिनी'? सलमानच्या पार्टीत एंट्री होताच काय घडलं पाहा Video

मुंबई : अभिनेता सलमान खान याच्या वतीनं यंदाच्या वर्षी त्याची बहिण अर्पिता खान आणि तिचा पती आयुष शर्मा यांनी ईदच्या पार्टीचं आयोजन केलं होतं. सलमान आणि अर्पिता या बहिणभावाच्या जोडीनं आणि आयुष शर्मानं खास मित्रपरिवाला या पार्टीसाठी आमंत्रित केलं होतं. त्याच्या आमंत्रणाचा मान ठेवत ही मंडळी खान कुटुंबाला ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचली. (Salman khan eid party)

शहनाज गिलपासून किआरा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा या सर्वांनीच या पार्टीला हजेरी लावली. पण, खरी रंगत तेव्हा आली जेव्हा अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलीया देशमुख या पती- पत्नीच्या जोडीनं पार्टीत एंट्री मारली. 

रितेश आणि जिनिलीया ही जोडी कायमच त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळं सर्वांची मनं जिंकत असते. चित्रपट असो किंवा मग प्रत्यक्ष आयुष्य. रितेश आणि जिनिलीयानं कधीच कुणालाही नाराज केलेलं नाही. 

ईदच्या पार्टीमध्येही त्यांचा असाच अंदाज पाहायला मिळाला. पार्टीला येणाऱ्या कलाकारांची एक झलक टीपण्यासाठी म्हणून आलेल्या छायाचित्रकारांनी ही जोडी येताच कल्ला सुरु केला. 

प्रत्येकानं 'दादा- वहिनी' अशी आपुलकीची हाक मारत त्यांचा फोटो टीपण्याची सुरुवात केली. तुम्ही खूप छान दिसताय, अशी प्रशंसाही कुणी केली. आपली होणारी प्रशंसा पाहता आणि आपल्याचा मिळणारं प्रेम पाहता, या दोघांनीही यावेळी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Pinkvilla (@pinkvilla)

जिनिलीयाचा खोडकर अंदाज आणि रितेशचा रुबाबदार अंदाज यांची सांगड या ईदच्या पार्टीमध्ये पाहायला मिळाली. थोडक्यात काय, तर ही जोडी कायमच सर्वांच्या पसंतीस का उतरते हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालं. 

Read More