Marathi News> मनोरंजन
Advertisement

20 हून अधिक वर्षे जिनिलियासोबत असणाऱ्या रितेशला तिच्यातील 'या' फॅक्टरची भीती

रितेशला सतावतेय वेगळीच भीती  

20 हून अधिक वर्षे जिनिलियासोबत असणाऱ्या रितेशला तिच्यातील 'या' फॅक्टरची भीती

मुंबई : मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये गाजलेलं एक नाव म्हणजे (riteish deshmukh) रितेश देशमुख. चित्रपटांच्या माध्यमातून रितेशनं चाहत्यांची मनं जिंकली. सोबतच त्याच्या मनमिळाऊ स्वभावानंही चाहत्यांवर कायमची छाप सोडली. असा हा अभिनेता त्याच्या खासगी आयुष्यामुळंही कायमच अनेकांपुढे आदर्श ठेवत असतो.

पती, पत्नी, मुलं आणि आई असं कुटुंब सांभाळत रितेश कामासोबतच या मंडळींनाही वेळ द्यायला कुठेच कमी पडत नाही. सध्यागही त्यांनं व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढत पत्नी, जिनिलिया हिच्यासाठी काहीतरी खास केलं आहे.

जिनिलियावर अतोनात प्रेम करणाऱ्या रितेशनं तिच्या वाढदिवसा निमित्तानं एक खास व्हिडीओ पोस्ट केला आहे. इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आलेल्या या व्हिडीओमध्ये त्यानं पत्नीसबोतचे काही खास क्षण सर्वांच्याच भेटीला आणले आहे. खोडकर, खेळकर अशी जिनिलिया आणि तिचा प्रत्येक हट्ट पुरवत प्रेमाची पावती देणारा रितेश या दोघांचंही नातं व्हिडीओच्या माध्यमातून पाहताना चाहत्यांनाही त्यांचा हेवाच वाटत आहे.

Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये पोहोचली 'धकधक गर्ल' माधुरी, कशी ते तुम्हीच पाहा

 

सुरेश वाडकर यांच्या स्वरातील 'तुमसे मिल के, ऐसा लगा...' हे गाणं या व्हिडीओला आणखी इमोशनल टच देत आहे. जिनिलियासोबतचे काही खास क्षण म्हणजे शब्दांतही व्यक्त करण्यापलीकडचे आहेत हीच भावना रितेश जणू या व्हिडीओच्या माध्यमातून मांडू पाहत आहे.

कारण, हा व्हिडीओ पोस्ट करत रितश लिहितो, 'देवाचं माझ्यावर खुप खास प्रेम आहे. सकाळी उठून तुझा चेहऱ्या पाहण्याहून सुरेख भावनाच नाही. आपल्याला एकत्र येऊन 20 वर्षे झाली, तरीही हे कालपरवाच झाल्यासारखं वाटत आहे. एक चांगली जोडीदार झाल्याबद्दल मी तुझा आभारी आहे. वाढदिवसाच्या शुभेच्छा बायको.  दर दिवसाआड तू आणखी तरुण दिसत आहेस. माझ्याबद्दल मात्र ते बोलू शकत नाही. लवकरच लोकं बोलतील, जिनिलियासोबत हे काका कोण आहेत?' रितेशनं अतिशय विनोदी अंदाजात त्याच्या मनातील भीतीही या पोस्टद्वारे व्यक्त केली आहे, हे पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर स्मित खुलत आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

रितेशची ही पोस्ट आणि व्हिडीओ पाहून जिनिलियानं, माझं तुझ्यावर स्वत:पेक्षाही जास्त प्रेम आहे अशा शब्दांत त्यांचे आभार मानले आहेत. 

Read More