Riteish Deshmukh Flop Movies: रितेश देशमुखचा 'रेड 2' चित्रपट बॉक्स ऑफिसवर सध्या धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रितेश देशमुखने नकारात्मक भूमिका साकारली आणि प्रसिद्धी मिळवली. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर बॉक्स सुपरहिट ठरला. 'रेड 2' नंतर रितेश देशमुखचा मल्टीस्टारर 'हाऊसफुल 5' मध्ये दिसणार आहे. हा चित्रपट 6 जून रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रितेश देशमुखने एकल अभिनेता म्हणून त्याच्या कारकिर्दीत फक्त 1 सुपरहिट चित्रपट दिला आहे. त्या चित्रपटाबद्दल तुम्हाला माहिती आहे का? या चित्रपटाचे यश पाहून निर्मात्यांनी या चित्रपटाचे कन्नड, तेलुगु आणि मल्याळम भाषेत रिमेक बनवले. परंतु, निर्मात्यांनी बनवलेले रिमेक हे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. इतकेच नाही तर या चित्रपटाचा सिक्वेल देखील बॉलिवूडमध्ये बनवण्यात आला होता. तो देखील फ्लॉप ठरला.
आम्ही रितेश देशमुखच्या 'मलामाल वीकली' चित्रपटाबद्दल बोलत आहोत. जो 2006 रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात रितेश देशमुखसह परेश रावल, रीमा सेन, परेश राव, राजपाल यादव, ओम पुरी हे कलाकार होते. त्यासोबतच या चित्रपटात अरबाज खानचा देखील एक छोटासा सीन आहे. बॉक्स ऑफिस इंडियाच्या मते, हा चित्रपट फक्त 7 कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 26.88 कोटी रुपयांची कमाई केली होती.
रितेशच्या ब्लॉकबस्टर चित्रपटाचे 3 रिमेक
2006 मध्ये हा चित्रपट तेलुगूमध्ये 'भाग्यलक्ष्मी बंपर ड्रॉ' या नावाने बनवण्यात आला होता. या चित्रपटात राजेंद्र प्रसाद, फरजाना आणि ऋृषी सारखे कलाकार होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर 2012 मध्ये कन्नडमध्ये 'डाकोटा पिक्चर' या नावाने बनवण्यात आला. हा चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. या चित्रपट ओम प्रकाश राव दिग्दर्शित चित्रपट होता. या चित्रपटात रॉकलाइन वेंकटेशन आणि निकेशा पटेल यांनी भूमिका साकारली होती.
या चित्रपटानंतर 2 वर्षांनी प्रियदर्शनने मल्याळममध्ये रिमेक केला. या चित्रपटाचे नाव 'अमायुम मुयालुम' होते. या चित्रपटात जयसूर्या, पिया बाजपेयी, मासूम आणि नेदुमुदी वेणू यांनी भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर प्रियदर्शनने नाना पाटेकर, परेश रावल आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत 'कमाल धमाल मालामाल' हा सिक्वेल बनवला. मात्र, तो बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.