Marathi News> मनोरंजन
Advertisement

मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काचा नवं गाणं

मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने नवं गाणं गायलं आहे, या गाण्याची झलक तिने तिच्या फेसबुक पेजवर लावली आहे.

मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काचा नवं गाणं

मुंबई : मुंबईच्या खड्ड्यांवर आरजे मलिष्काने नवं गाणं गायलं आहे, या गाण्याची झलक तिने तिच्या फेसबुक पेजवर लावली आहे. हे गाणं मराठीतील सुपर हिट सिनेमा सैराटच्या झिंगाट गाण्यावर आधारीत आहे. मलिष्काने या गाण्याची एक झलक तिच्या फेसबुकवर लावली असली, तरी यात मुंबईच्या खड्ड्यांचाच विषय आहे. यापूर्वी आरजे मलिष्काने सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाय का या गाण्यावर आधारीत गाणं गायलं होतं.

यात आर जे मलिष्काने मुंबईच्या खड्ड्यांवर भाष्य केलं होतं, तेव्हा काही शिवसेना नेत्यांनी आरजे मलिष्कावर टीका देखील केली होती. आरजे मलिष्का सुपर हिट गाण्यांचं संगीत आणि शब्द घेऊन नवीन गाणं घेऊन येते, ज्यात सध्याच्या परिस्थितीवर भाष्य असेल.

Read More