Marathi News> मनोरंजन
Advertisement

हॉलिवूडमध्ये नव्या 'बॅटमॅन'ची एन्ट्री

नव्या बॅटमॅनबाबत मोठा खुलासा करण्यात आला आहे.

हॉलिवूडमध्ये नव्या 'बॅटमॅन'ची एन्ट्री

नवी दिल्ली : हॉलिवूडमधील बहुचर्चित DCEU (डीसी एक्सटेंड यूनिवर्स)चा प्रसिद्ध सुपरहिरो चित्रपट 'द डार्क नाइट'ला त्यांचा नवा बॅटमॅन मिळाला आहे. DCEUच्या आगामी 'द डार्क नाइट' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन प्रमुख भूमिका साकारणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या नावाची चर्चा होती, मात्र आता बॅटमॅनच्या भूमिकेसाठी रॉबर्ट पॅटिनसनचं नाव निश्चित करण्यात आलं आहे.

गेल्या वर्षी बॅटमॅनची भूमिका साकारणारा अभिनेता बेन एफ्लेकने आगामी 'द डार्क नाइट' चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम करण्यास नकार दिला होता. त्यानंतर आता ही बॅटमॅनची भूमिका कोण साकारणार यावर चर्चा सुरु होती. अखेर आता नव्या बॅटमॅनबाबत मोठा खुलासा करण्यात आला. 'द डार्क नाइट'च्या सिक्वेलमध्ये 'Twilight' अभिनेता रॉबर्ट पॅटिनसन भूमिका साकारणार यावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. 

32 वर्षीय रॉबर्ट पॅटिनसन बॅटमॅनची भूमिका साकारणारा सर्वात तरुण अभिनेता ठरणार आहे. गेल्या वर्षी रॉबर्ट पॅटिनसनने 'हाय लाइफ', 'द लाइटहाउस' आणि 'द किंग' यांसारख्या चित्रपटातून भूमिका साकारल्या होत्या. आता हा नवा बॅटमॅन प्रेक्षकांच्या किती पसंतीस उतरतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Read More