Marathi News> मनोरंजन
Advertisement

RARKPK चित्रपटात कापलेला 'तो' इंटिमेट सीन करण जोहरने केला शेअर, आलिया-रणवीरचा रोमँटिक अंदाज

alia bhatt and ranveer singh deleted scene: आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा चित्रपट यावर्षी तूफान गाजला. आता चर्चा आहे ती म्हणजे त्यांच्या एका डिलिटेड सीनची. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

RARKPK चित्रपटात कापलेला 'तो' इंटिमेट सीन करण जोहरने केला शेअर, आलिया-रणवीरचा रोमँटिक अंदाज

alia bhatt and ranveer singh deleted scene: 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट चांगलाच लोकप्रिय झाला आहे. त्यातून आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या अभिनयावरही चाहते वेडे झाले आहेत. त्यामुळे चाहतेही त्यांच्या प्रेमात पडले आहेत. करण जोहरचा हा चित्रपट गेले अनेक दिवस चर्चेतही होता. अनेक दिवसांपासून इंटरनेटवर त्या दोघांचा इंटिमेट सीन व्हायरल होतो आहे याची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यातून यावेळी हाच सीन करण जोहरनं वेळ मारून टाकला आहे काय, याचीही जोरात चर्चा रंगलेली आहे. हा सीन शेअर केल्यानंतर अनेकांना आलिया आणि रणवीर हा अंदाज आवडला आहे. त्यातून कमेंट्समध्ये चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. अशाच आता चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट ओटीटीवर कोणत्याही कटशिवाय प्रदर्शित करा, अशीही मागणी काही नेटकरी करत आहेत. 

गेल्या काही दिवसांपासून आलिया भट्ट आणि रणवीर सिंगचा एक डिलिट सीन झालेला चांगलाच चर्चेत होता. आता करण जोहरनंच इन्टाग्रामवरून तो शेअर केला आहे. त्यामुळे त्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. हा डिलिट केलेला सीन चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये आपण पाहिला होता. परंतु हा चित्रपटातून मात्र वगळ्यात आला होता. या चित्रपटातल्या वेळेची मर्यादा पाळण्यासाठी हा सीन या चित्रपटातून काढून टाकण्यात आला होता. या सीनमध्ये रॉकीपासून वेगळं झाल्यानंतर मला पुर्वीसारखं व्हायला थोडा वेळ लागेल पण मी ती होईन असं रानी स्वत:शी बोलताना दिसते आहे , तेवढ्यात रॉकी खिडकीतून येतो मग त्यांचा रोमॅण्टिक अंदाज हा पाहायला मिळतो. 

हेहा वाचा : 'दिल चाहता हैं' फेम अभिनेत्याचं निधन; महिन्याभरापुर्वीच आलेली लोकप्रिय वेबसीरिज, शाहरूखसोबतही काम

अनेक नेटकरी या सीनवर रिएक्ट होत आहेत. काहींनी म्हटलंय की हा सीन चित्रपटात असायला हवा होता. तर काहींना म्हटंलय की दोघांचा रोमॅण्टिक अंदाज आवडला. त्यातून काहींनी म्हटलंय की, हा सीन चित्रपटातील खूप चांगला सीन आहे. या चित्रपटातील धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्या किसिंग सीनची चांगलीच चर्चा रंगलेली होती. त्यानंतर त्यांची चांगलीच चर्चाही रंगली होती. त्यांच्या या सीनवर हेमा मालिनीापासून धर्मेंद्र आणि शबाना आझमीही रिएक्ट झाले होते. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

आता हा चित्रपट ओटीटीवरही प्रदर्शित झाला आहे. 28 जूलै रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. आता म्हणता म्हणता दोन महिनेही झाले आहेत. 

Read More